Residential photo
Residential photo 
उत्तर महाराष्ट्र

एटीएम चोरून गंडा घालणाऱ्या महिलेला अटक 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महिलेच्या पर्समधून एटीएम कार्ड चोरून त्यावरून ऑनलाइन खरेदी करीत, सुमारे दीड लाख रुपयांना गंडविल्याप्रकरणी सायबर पोलिसानी संशयित महिलेला अटक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल आहे. 

शाकेरा अब्दुल शेख (33, रा. गोरेवाडी, नाशिकरोड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ज्योती दीपक शिंदे (रा. कैलास नगर, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या महिन्यात त्यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने एटीएम कार्ड चोरी केले होते. त्यानंतर संशयिताने त्या कार्डचा वापर करीत, ऑनलाइन पद्धतीने 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान, दीड लाख रुपयांची खरेदी केली होती. सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर ज्योती शिंदे यांनी गेल्या 30 सप्टेंबरला सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीसह फसवणूकीची फिर्याद दिली. 
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांच्या पथकाने तपास सुरु केला. चोरट्याने 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान चोरीचे एटीएम कार्ड वापरून ऑनलाइन खरेदी केली होती. त्यानुसार पोलिसांनी सर्व व्यवहार तपासत, तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित महिला शाकेरा शेख हिला अटक केली. शाकेरा हिने खरेदी केलेली 15 हजार रुपयांची सोन्याची चैनही पोलिसांनी जप्त केली आहे. न्यायालयाने शाकेरा हिस पोलीस कोठडी सुनावली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे, पोलीस हवालदार किरण जाधव, पोलीस नाईक संतोष काळे, पोलीस शिपाई दीपाली नेटके, शामल जोशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT