Mohan Desle while giving guidance regarding the exam.
Mohan Desle while giving guidance regarding the exam. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : परीक्षा भय अन कॉपीमुक्त घ्याव्यात : सचिव मोहन देसले

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : नाशिक विभागासह जिल्ह्यात दहावी, बारावीच्या परीक्षा भयमुक्त, कॉपीमुक्त घ्याव्यात, अशी अपेक्षा नाशिक विभागीय मंडळाचे सचिव मोहन देसले यांनी व्यक्त केली.

दोंडाईचा येथील हस्ती संस्कृती भवनात मंगळवारी (ता. १३) धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्र संचालकांची परीक्षा कामकाजसंदर्भात सभा झाली. (Secretary Mohan Desale statement Exams should be conducted fear free and copy free dhule news)

सचिव देसले, सहसचिव डॉ. मच्छिंद्र कदम, नंदुरबारचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, येथील माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी पवार यांनी मार्गदर्शन केले.

परीक्षा निकोप, भयमुक्त वातावरणात घ्यावी, असे आवाहन मार्गदर्शकांनी केले. सचिव देसले यांनी बोर्डाचे नियम विद्यार्थ्यांना सांगावेत, असे निर्देश दिले. परीक्षेसाठी योग्य वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

डॉ. कदम यांनी परीक्षा केंद्र संचालकांनी जबाबदारीने भूमिका पार पाडावी, असे आवाहन केले. त्यांनी परीक्षेसंदर्भात मुद्देसूद माहिती देत सूचनापुस्तिकेचे काळजीपूर्वक वाचन करण्यास सांगितले.

परीक्षापूर्व, परीक्षाकालीन व परीक्षेनंतरच्या कामकाजाचे नियोजन, केंद्र संचालकांच्या कर्तव्यांची माहिती त्यांनी दिली. नाशिक विभाग कॉपीमुक्त करण्यासाठी अभियान राबवावे, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले. मंडळाचे अधीक्षक आर. बी. गोसावी, सहाय्यक संजय बोरसे, श्री. चौधरी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी पाणी आणावे

दहावी, बारावीच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी स्वतःची पारदर्शक बॉटल आणावी, असे आवाहन सचिव देसले व मान्यवरांनी केले.

पाणीवाटपासाठी शिपाई किंवा वॉटर बॉय ही संकल्पना यंदापासून बंद करण्याचा निर्णय झाला असून, परीक्षार्थींनी स्वतःची पाणी बॉटल आणावी, त्यासाठी व्हरांड्यात पाण्याचा पिंप भरून दिला जावा, अशी सूचना सभेत देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT