nashik
nashik 
उत्तर महाराष्ट्र

शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील युवकाची सैन्यदलात निवड

संदिप मोगल

लखमापूर (नाशिक) - बोपेगाव ता. दिंडोरी येथील वयाच्या अवघ्या पंचविशीत पतीने आत्महत्या केल्यामुळे वैधव्य आल्यानंतरही खचून न जाता आपल्या लहानग्या दोन लेकरांना मोलमजुरी करत लहानाचे मोठे करून त्यापैकी एकाला लष्करात भरती करून आपल्या पतीचे लष्करात जाण्याचे स्वप्न पूर्ण केले. बोपेगाव हे तसे चार हजार लोकवस्तीचे छोटेसे खेडेगाव पण या गावातील तब्बल डझनभर युवक आज देशाच्या सीमेवर देशसेवा करत आहे. त्यात आज गावातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील आशिष अनिल कावळे या युवकाची सैन्य दलात निवड झाल्यामुळे आणखी एक जवनाची भर पडली. त्यामुळे कधीकाळी जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू मानले जाणारे गाव आता लष्करी जवानांचे गाव म्हणून परिसरात ओळखले जाऊ लागले आहे.

गावातील अल्पभूधारक शेतकरी अनिल दिनकर कावळे या युवकाने २०१० 
मध्ये ऐन दिवाळीत आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली वयाच्या तिशीत विधवा झाल्यामुळे संसार उधवस्थ झालेल्या मीना अनिल कावळे या मातेने खचून न जाता मोलमजुरी करत अवघ्या ११ वर्षाचा आशिष व त्याच्यापेक्षा २ वर्षांनी लहान असलेला मनीष या दोन पितृछत्र हरपलेल्या लेकरांचे पालनपोषण करून मोठ्या मुलाचे १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांचे लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलाला सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन दिले. 

त्यानंतर सलग २ वर्ष अथक मेहनत घेऊन आशिष ने सैन्यात भरती होऊन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करत मोलमजुरी करून आपले पालनपोषण करणाऱ्यां आईचा विश्वास सार्थ ठरवत तिला अभिमान वाटावा असा आदर्श निर्माण केला. आशिष लवकरच लष्करी प्रशिक्षण घेण्यासाठी रवाना होणार असून, त्यानंतर तो देशसेवेसाठी सज्ज होणार आहे. पण आपल्या मुलाची सैन्य दलात निवड झाली ही बातमी समजल्यानंतर त्याच्या आईला आपल्या मुलाच्या अभिमान वाटत असून तिने आनंद व्यक्त केला आहे. लहानपणापासून लष्करी सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे त्याच्या बालपणीच्या मित्रांनाही आनंद व्यक्त केला आहे.

लहानपणी पाचवीच्या वर्गात असताना वडिलांनी आत्महत्या केली काही कळण्याचे वय नव्हते पण वडील गमावल्याची जाणीव झाली होती. अवघा १ बिघा जमिनीवर उपजीविका होणे शक्य नसल्यामुळे आई ने मोलमजुरी करून आम्हा दोन्ही भावंडांसह उदरनिर्वाह केला. आज तिने सतत जाणीव करून दिलेलं वडिलांचं सैन्यात जाण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद खूप मोठा आहे
.- आशिष अनिल कावळे

वयाच्या तिशीत पतींनी आत्महत्या केल्यामुळे सगळं संपलं होत. पण खचून न जाता मोलमजुरी करुन दोन लहान लेकरांना भविष्याचा आधार म्हणून पाहिलं. त्यांना वाढवलं. गेली दोन वर्षे माझा आशिष सैन्यात भरती होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत होता. प्रचंड जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर त्याने आज वडिलांचे स्वप्न पूर्ण केले याचा आनंद तर आहेच. पण माझा मुलगा देशसेवेसाठी सैन्यात दाखल झाला याचा खूप अभिमान वाटतोय.
- श्रीमती मीनाताई अनिल कावळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT