Shindkheda: Tehsildar Asha Gagurde-Sanghvi during the indefinite hunger strike of Shiv Sena District Deputy Chief Shanabhau Sonwane. Neighbors include former state minister Hemant Deshmukh, police inspector Sunil Bhabad and others esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शानाभाऊ सोनवणे यांचे उपोषण मागे

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : शिंदखेडा येथे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व नवे आच्छी येथील शेतकरी रावसाहेब ईशी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासकीय इमारतीबाहेर बैलगाडीवर २६ जानेवारीला बेमुदत उपोषणाला बसले होते.

सोमवारी (ता. ३०) पाचव्या दिवशी दुपारी प्रभारी तहसीलदार आशा गांगुर्डे- संघवी यांच्या लेखी आश्र्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. (Shanabhau Sonwane hunger strike is over Fight for Farmers Special meeting under chairmanship of District Magistrate Bhamre on 7th February Dhule News)

शेतकऱ्यांच्या मालाला खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसला १८ तास वीजपुरवठा करावा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, बँक व वीज वितरण कंपनीने सक्तीची वसुली थांबवावी आदी मागण्यांसाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शानाभाऊ सोनवणे व शेतकरी रावसाहेब ईशी शिंदखेडा येथे बेमुदत उपोषणाला बसले होते‌. सोमवारी तहसीलदार आशा गांगुर्डे-संघवी यांच्या लेखी आश्वासनानंतर ग्लुकोज पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

यावर उपोषणकर्त्यांचे समाधान झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले. उपोषण सोडण्यासाठी शिंदखेडा पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या वेळी माजी कामगार राज्यमंत्री हेमंत देशमुख, अमित पाटील, माजी नगरसेवक भूपेंद्र धनगर, लोहगावचे सरपंच महेंद्र पाटील, सखाराम ईशी, सागर देसले, नंदू पाटील, रवींद्र मोहने, कुणाल माळी, भूषण सोनवणे, बापू देसले, गौतम कोळी, मनोज परदेशी, प्रवीण वाकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

तहसीलदारांचे लेखी आश्वासन

तहसीलदार गांगुर्डे-संघवी यांनी लेखी पत्रात म्हटले आहे, की नाशिक पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता सुरू असल्याने या विषयावर बैठक घेता येत नाही. मागण्यांनुसार संबंधित विभागाची विशेष बैठक ७ फेब्रुवारीला शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार असून, यातून उचित मार्ग काढण्यात येईल. उपोषण मागे घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा

Satara Child Marriage: कुमारवयातच वाढतेय संसाराचे ओझे; प्रेमाच्या आड ‘छुप्या बालविवाहा’चे सातारा जिल्ह्यात वाढताहेत प्रकार, संकटाची चाहूल!

SCROLL FOR NEXT