
Shivsena: उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार की नाही! मुदत संपल्यानंतर पक्षाची कमान कोणाकडे?
उद्धव ठाकरे यांच्यासमोर जसा पक्षचिन्हाचा वाद आहे. तसाचं पक्षप्रमुख पदाचा देखील पेच निर्माण झाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) यांनी पक्षांतर्गत निवडणुकीसाठी आयोगाला विनंती केली किंवा सद्यस्थिती कायम ठेवावी, अशी विनंती निवडणूक आयोगाला केली. मात्र, अद्याप निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपला आहे, मग यानंतरही ते पक्षाचे अध्यक्षपद कायम ठेवणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे
23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख या पदावर कार्यकाळ संपला. या पक्षप्रमुख पदाच्या निवडीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेण्यासाठीची मागणी केली होती, निवडणूक शक्य नसल्यास उद्धव ठाकरे यांनाच पक्षप्रमुख पदावर कायम करण्याची मागणी करण्यात आलेली होती.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी याबाबत नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत घेऊन माहिती दिली होती. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच घटनातज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे. प्रत्यक्ष कायदा निवडणूक आयोगात याबाबत नाही मात्र राज्यपाल पदाबाबतचा संदर्भ देऊन पक्षप्रमुखपदाबाबत माहिती देण्यात आली आहे.
घटनातज्ज्ञांनाच्या मतानुसार केंद्रीय निवडणूक आयोगात प्रत्यक्ष तसा कायदा नाही, परंतु सर्वधारण कायद्यानुसार राज्यपाल हे पाच वर्षासाठी असतात, मात्र त्यांचा कालावधी संपला तरी नवीन राज्यपाल येईपर्यंत ते पदावर असतात. राज्यपालांच्या निवडीप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्याबाबत होऊ शकतं, नवीन कोणाची निवड झाली नाही तर उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख पदावर राहतील असं घटनातज्ज्ञांनाचं मत आहे.