state level one act play competition will begin at Natyaviskar Natyamandir in Nandurbar from today news
state level one act play competition will begin at Natyaviskar Natyamandir in Nandurbar from today news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबारात आजपासून नाट्याविष्कार

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदेतर्फे नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात दोनदिवसीय हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला शनिवार (ता. १०)पासून सुरवात होत आहे. यात राज्यभरातून अकरा नाट्य संस्थांनी सहभाग घेतला आहे.

नंदुरबार येथे १० व ११ फेब्रुवारीदरम्यान कालकथित जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ यांच्या स्मरणार्थ दि हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक लि. प्रायोजित हस्ती-जिभाऊ करंडक स्पर्धा होणार आहे. (state level one act play competition will begin at Natyaviskar Natyamandir in Nandurbar from today news)

स्पर्धेत महाराष्ट्रातून मुंबई, नाशिक, जळगाव, चोपडा, नंदुरबार, धुळे, शहादा येथील नाट्यसंस्था सहभागी होणार असून, ११ एकांकिकांची नोंद झाली आहे. स्पर्धेचे उद्‍घाटन शनिवारी दुपारी दीडला नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या हस्ते होणार आहे.

माजी प्राचार्य बी. एस. पाटील अध्यक्षस्थानी असतील. दि हस्ती को-ऑप. बँक लि. गिरीविहार शाखेचे कमिटी चेअरमन धनेश लुणावत, ज्येष्ठ साहित्यिक दीनानाथ मनोहर, दि हस्ती को-ऑपरेटिव बँक लि., नंदुरबार शाखेचे कमिटी सदस्य प्रकाश नानकानी, तसेच मान्यवर म्हणून माजी नगरसेवक संजय चौधरी.

सामाजिक कार्यकर्त्या सुलभा महिरे, युवा उद्योजक मिलिंद पहुरकर, जयहिंद इलेक्ट्रॉनिकचे नरेश नानकाणी, अण्णासाहेब पी. के. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष शीतलकुमार पाटील, जय हिंदळा माता ट्रायबल एज्युकेशन सोसायटीचे सचिव गिरीश वसावे.

कृषी अधिकारी विजय मोहिते, ‘सकाळ’ जिल्हा प्रतिनिधी धनराज माळी, नवोदय विद्यालय, अक्कलकुवाचे सुरेंद्र देवरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण ११ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाचला महाराष्ट्राची हास्यजत्राफेम तथा सिनेमा नाट्यअभिनेते हेमंत पाटील व कुणाल मेश्राम यांच्या हस्ते होणार आहे.

विशेष अतिथी म्हणून दि हस्ती को-ऑप. लि., दोंडाईचाचे अध्यक्ष कैलास जैन, नंदुरबार जिल्हा प्राथमिक व माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, एसव्हीएनआयटी सुरतचे प्रा. डॉ. शिवानंद सूर्यवंशी, तर मान्यवर म्हणून कृषी अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, उद्योजक आनंद जैन, ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रमाकांत पाटील.

सिनेनिर्माता तथा प्रसिद्ध मूर्तिकार मनोज वसईकर, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष फखरुद्दीन जलगुणवाला, स्टेट बँक ऑफ इंडिया हाउसिंग लोन कौन्सिलर मनीष बिरारे, बालरोगतज्ज्ञ डॉ. समिधा नटावदकर-पाने, मुख्याध्यापक बी. एस. पवार, दंतचिकित्सक डॉ. प्रियंका संजय चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे.

ही माहिती आयोजन समितीचे नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार यांच्यासह तुषार सांगोरे, क्षमा वसईकर, कुणाल वसईकर, जितेंद्र खवळे, राहुल खेडकर, सागर कदम, काशीनाथ सूर्यवंशी, चिदानंद तांबोळी, पुरुषोत्तम विसपुते, हर्शल महिरे, प्रफुल्ल महिरे, जितेंद्र पेंढारकर, पार्थ जाधव यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Result: वय-25 वर्षे, पद-खासदार... हे आहेत सर्वात तरुण MP, राजकीय धुरंधरांचा केला पराभव

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मान्य? अमित शाहांसोबत नेमकी काय चर्चा झाली?

T20 World Cup 2024 : भारत, पाकिस्तानचे जास्तच लाड चालेत.... श्रीलंकेच्या संसदेत आयसीसीवर झाला पक्षपातीपणाचा आरोप

Shrikant Shinde: शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी श्रीकांत शिंदे; श्रीरंग बारणे बनले मुख्य प्रतोद

PM Modi Claim Power: मोदींनी राष्ट्रपतींकडं केला सत्ता स्थापनेचा दावा; शपथविधीसाठी दिलं निमंत्रण

SCROLL FOR NEXT