Sand  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : वाळूची अवैध वाहतूक; ठार करण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : छडवेल पखरुण (ता. साक्री) येथे वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांनी तलाठी व कोतवाला यांना ठार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल झाला. (Threats to kill illegal sand transport dhule crime news )

साक्री तहसीलदार रावसाहेब सोनवणे यांनी शुक्रवारी (ता. ३) रात्री आठच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती तलाठी नीलेश राठोड यांना दिली.

त्यानुसार श्री. राठोड यांनी जैताणे तलाठी प्रशांत माळी, कोतवाल कुंदन सैंदाणे तसेच भाडणेचे कोतवाल दीपक सोनवणे यांना छडवेल पखरूणजवळील पेट्रोलपंपाजवळ होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीच्या ठिकाणी बोलावले. तेव्हा तेथे एक ट्रॅक्टर वाळूची बेकायदा वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले.

अधिक चौकशीत ट्रॅक्टर विजापूर गावातील भाऊसाहेब रघुनाथ सूळ यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. साक्रीचे कोतवाल कुंदन सैंदाणे ट्रॅक्टरवर चढले असता ट्रॅक्टरमालकाने चालकाला इशारा करून ट्रॅक्टर पळविण्यास सांगितले.

तसेच शिवीगाळ करीत ट्रॅक्टरवरून यास उतरू द्यायचे नाही, आज त्याला मारून टाकायचे आहे, असे म्हटले. तसेच तलाठी राठोड व तलाठी माळी यांनाही अडवून शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT