kanhaiya-kumar Team eSakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Eletctions : काँग्रेस नेता कन्हैय्या कुमारवर अ‍ॅसिड हल्ला?

उत्तर प्रदेशमध्ये प्रचारादरम्यान ही घटना घडली आहे.

सुधीर काकडे

Uttar Pradesh Assembly Elections 2022 : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या काँग्रेस नेता कन्हैया कुमार (Congress Leader Kanhaiya Kumar) यांच्यावर अ‍ॅसिड सदृष्य रसायन फेकल्याची (Chemical Attack) घटना घडली आहे. लखनऊमधील काँग्रेस कार्यालयात कन्हैया कुमारवर अ‍ॅसिड फेकण्यात आल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येतंय.

या घटनेत कन्हैय्या कुमार त्यांच्यावर फेकलेला पदार्थ नेमका काय होता स्पष्ट झालेलं नाही. मात्र काँग्रेस नेत्यांनी, आरोपींनी कन्हैयावर अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या अंगावर पडला नाही असा आरोप केला आहे. रसायणाचे काही थेंब शेजारी उभ्या असलेल्या ३-४ तरुणांवर पडले. दुसरीकडे रसायण फेकणाऱ्या तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं. काँग्रेसच्या मुख्यालयात कन्हैया कुमारच्या विरोधात घोषणाबाजी करत एका युवक आला आणि त्याने हे कृत्य केलं. शाई मिसळलेलं रसायन फेकत त्यानं कन्हैय्या कुमारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दोन समर्थक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

दरम्यान, आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, तर जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. एडीसीपी सेंट्रल राघवेंद्र मिश्रा यांनी सांगितलं की, आरोपीला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. कन्हैया कुमार देशविरोधी बोलतो त्यामुळे हे शाईमध्ये केमिकल मिसळल्याची कबुली देवांश वाजपेयी या आरोपीने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT