
PM मोदी म्हणतात, 'बजेटचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे गरीबांचं कल्याण!'
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर केला आहे. केंद्र सरकारने काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. हे बजेट सामान्यांसाठी झिरो बजेट (Union Budget) ठरलं असल्याची टीका विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता देशवासीयांना संबोधित केलं आहे आणि बजेटचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा: बजेटमधून मिळाला 'एवढा मोठा भोपळा'; राहुल गांधींची खोचक प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय की, या बजेटचा लाभ आपल्या देशातील युवा, मध्यमवर्ग, दलित, वंचितांना मिळणार आहे. या बजेटचं मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गरीबांचं कल्याण! प्रत्येक गरीबाकडे पक्के घर, नळाने पाणी, त्याच्याजवळ शौचालय, गॅसची सुविधा, या सगळ्यावर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. यासोबतच आधुनिक इंटरनेट कनेक्टीव्हीटीवरही जोर देण्यात आला आहे.
पुढे ते म्हणाले की, हिमालयाच्या पूर्ण पट्ट्यामध्ये जीवन सोपं व्हावं ही बाब लक्षात घेता नवी घोषणा केली आहे. हिमचाल, उत्तराखंड, जम्मू काश्मीर अशा क्षेत्रासाठी पहिल्यांदा 'पर्वतमाला योजना' घोषित करण्यात आली आहे. या योजना डोंगराळ भागातील ट्रान्स्पोर्टेशन आणि कनेक्टीव्हीटीसाठी काम करेल. यामुळे बॉर्डरवरील गावांना फायदा होईल. भारताच्या कोट्यवधी लोकांना माँ गंगेच्या सफाईसोबतच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मोठं पाऊल उचललं गेलं आहे. गंगा किनाऱ्यावर नॅचरल शेतीला प्रोत्साहन दिलं आहे. आई गंगेला केमीकल मुक्त करण्यासाठी मदत मिळेल. बजेटमध्ये शेती लाभदायक आणि नव्या संधी मिळाव्यात, अशी योजना आहेत. फूड प्रोसेसिंगसाठी नवं पॅकेज. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा: "बेरोजगारी, महागाईने त्रस्त नागरिकांच्या पदरी भोपळा"
पुढे त्यांनी म्हटलंय की, या बजेटमधून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढणार, एमएसएमईची मदत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. अर्थसंकल्पाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे. त्यातून सर्वांना फायदा होणार आहे. यातून आत्मनिर्भरतेकडे मोठं पाऊल पडणार आहे. यातून लहान आणि अन्य उद्योगांसाठी नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
पुढे त्यांनी अर्थमंत्र्यांचं कौतुक करत म्हटलंय की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या टीमला या पीपल फ्रेंडली आणि लोकोपयोगी बजेटसाठी खूप अभिनंदन करतो. काल भाजपने मला सकाळी अकरा वाजता बजेट आणि आत्मनिर्भर भारतावर बोलण्यासाठी निमंत्रित केलं आहे. उद्या अकरा वाजता मी या विषयावर विस्ताराने बोलेन.
Web Title: Pm Modi Says The Big Feature Of The Budget Is The Welfare Of The Poor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..