File photo
File photo 
विदर्भ

बारावी फेरपरीक्षा निकाल : नागपूर विभाग दुसऱ्या स्थानावर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या मुख्य परीक्षेच्या निकालात शेवटून पहिला क्रमांक मिळविणाऱ्या नागपूर मंडळाचे स्थान फेरपरीक्षेत सुधारले आहे. शुक्रवारी मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात 28.32 टक्के निकाल देत, विभागाने राज्यात दुसरे स्थान पटकाविले आहे. पहिले स्थान 33.89 टक्‍क्‍यासह लातून विभागीय शिक्षण मंडळाने पटकाविले आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी 17 ते 31 जुलैदरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेत 16 हजार 772 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी 16 हजार 756 विद्यार्थी परीक्षेत बसले. त्यापैकी 4 हजार 745 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. विज्ञान शाखेतून सर्वाधिक 32.73 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सर्वात कमी 25.10 टक्के विद्यार्थी एमसीव्हीसी शाखेतून उत्तीर्ण झाले आहेत. विभागातून भंडारा जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 46.77 टक्के तर नागपूर जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी 21.39 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी विभागाचा फेरपरीक्षेचा निकाल 25.51 टक्के लागला होता. यावर्षी त्यामध्ये 2.81 टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे उन्हाळी परीक्षेत निकाल 5.06 टक्‍क्‍यांनी घटला होता.

पहिले तीन विभाग
लातूर - 33.81
नागपूर - 28.32
औरंगाबाद - 28.16

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT