विदर्भ

‘पुनर्वसना’च्या आगीत १३० हेक्‍टर जंगल खाक

सकाळवृत्तसेवा

चिखलदरा / अकोट - मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या केलपानी  परिसरात आंदोलनकर्त्यांनी जंगलाला आग लावल्याने १३० हेक्‍टर कुरण खाक झाले असून वनविभाग व पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांची धरपकड सुरू झाली आहे. ३० जणांना ताब्यात घेतले आहे. 

मंगळवारी (ता. २२) जमावाने वनविभाग व पोलिस पथकावर हल्ला करून वाहनांची नासधूस केली होती. त्यात जाळपोळीत धारगढ येथील १०० हेक्‍टर कुरण जळाले, तर अन्य ठिकाणचे  ३० हेक्‍टर, असे १३० हेक्‍टरवर पसरलेल्या गवती कुरणाच्या आगीत नुकसान झाले. शिवाय  दीड लाख रुपयांची पाइपलाइन, ३ लाखांच्या सोलर प्लॅंटचे त्यात नुकसान झाले. वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी तयार केलेल्या तीन पाणवठ्यालाही फटका बसला. अमोना येथील साडेपाच लाखांचा एक ट्रॅक्‍टर, १ लाख ९५ हजारांचे सोलर वॉटरपंप, तर ९० हजारांच्या दोन फायर ब्लोअर मशीनचीही तोडफोड झाली. अमोना येथील फिल्टर प्लॅन्टची नासधूस केली. शिवाय शासकीय वाहनांमध्ये उपवनसंरक्षक अकोट यांची एक जीप, उपविभागीय पोलिस अधिकारी अंजनगावसुर्जी यांचे एक, तर चिखलदरा पोलिसांच्या दोन वाहनांची तोडफोड संतप्त जमावाने केल्याची बाब वनविभाग व पोलिसांच्या संयुक्त चौकशीतून पुढे आली. जवळपास दीडशेच्या वर व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यापैकी चौघांना वनविभागाने बुधवारी  अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारी अतिक्रमण करणाऱ्यांपैकी कुणीच घटनास्थळी नव्हते व परिसरात शांतता होती. आंदोलनकर्ते जंगलातून निघाले असले तरी दहशत कायम होती. मोठ्या फौजफाटा हल्ल्यानंतरही तेथे तैनात  होता. मंगळवारच्या घटनेनंतर सर्व यंत्रणा कामास लागली आहे. वनखाते व पोलिसांच्या मदतीने पुनर्वसित गावांमध्ये शोधमोहीम राबविण्यात आली. मंगळवारी ताब्यात घेतलेल्या ३० आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. येथे अकोला व अमरावतीचे पोलिस तैनात करण्यात आले आहे. सद्य परिस्थिती शांतता असून, अटक सत्र सुरू आहे.

माजी आमदार राजकुमार पटेल अधिकाऱ्यांसमवेत कासोद शिवापूर येथे पुनर्वसित आदिवासी बांधवांशी चर्चा करीत आहेत.

बेमुदत संपाचा इशारा
मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील पुनर्वसित करण्यात आलेल्या ५०० गावकऱ्यांच्या जमावाने वनपाल, वनरक्षक व वनमजुरांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेने निषेध केला आहे. यातील दोषींवर कडक कारवाई न झाल्यास बेमुदत संपाचा इशाराही संघटनेने दिला आहे. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने प्रधान मुख्य वनरसंरक्षक निवेदन देऊन निषेध नोंदविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT