dead body 
विदर्भ

वीस तासांपेक्षा अधिक काळ पडून होता मृतदेह; काय असावे कारण...वाचा 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती  : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय व संदर्भसेवा रुग्णालयाच्या कोविड रुग्णालयात दाखल काही संशयितांचा मृत्यू होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत एकच शववाहिका असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना तासन्‌तास वाट बघावी लागत आहे. 

आपत्तीची परिस्थिती असल्याने काही तातडीच्या उपाययोजना संबंधित यंत्रणेला करणे गरजेचे आहे. कामाच्या वाढत्या व्यापाचे कारण पुढे केले जाते. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अंमलबजावणीची जबाबदारी कुणाची? हा आता संशोधनाचाच विषय झाला आहे. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ त्यांची स्वतंत्र एकही शववाहिका नाही. महानगरपालिका प्रशासनाजवळ एक शववाहिका आहे. संशयित रुग्णाचा जरी मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी जाऊ नये, असा नियम प्रशासनाने घालून दिला. ज्या ठाण्याच्या हद्दीत मृत व्यक्ती राहत असेल, त्या ठाण्याला मृत्यूची माहिती दिली जाते. त्यानंतर पोलिसांकडून महापालिकेला शववाहिका पाठविण्यासाठी विनंती करावी लागते. आवश्‍यक व्यक्ती व संपूर्ण कीटसह शववाहिका पाठविण्याची जबाबदारी पालिकेची आहे. अंत्ययात्रेच्या वेळी पोलिस अधिकारी हजर असतात. परंतु आता शववाहिकाच वेळेवर मिळत नसल्याने पोलिसांपुढेही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

जिल्हा प्रशासनाने अद्याप पर्यायी शववाहिका अधिग्रहित करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या नाहीत. शनिवारी (ता. 25) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास इर्विनच्या कोविड वॉर्डात दाखल गाडगेनगर हद्दीतील एका वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृतदेह रविवारी (ता.26) दुपारपर्यंत इर्विनच्या शवागारातच होता. कारण पोलिसांना शववाहिकाच उपलब्ध होऊ शकली नाही. 24 एप्रिल रोजी इर्विनमध्ये दाखल दुसऱ्याही महिलेचा उपचारादरम्यान रविवारी (ता. 26) सकाळी पावणेनऊच्या सुमारास मृत्यू झाला. तो मृतदेह रविवारी दुपारी महापालिकेच्या शववाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. परंतु महेंद्र कॉलनीतील वृद्धेच्या नातेवाइकांना मात्र सायंकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. 

आपत्कालीन परिस्थितीत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेणे सोईचे व्हावे म्हणून पर्यायी शववाहिका उपलब्ध करून द्यावी, यासाठी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. 
- मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे. 

उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य प्रशासन उपलब्ध संसाधनांचा वापर करून सेवा देत आहे. सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे स्वत:ची शववाहिका नाही. 
- डॉ. श्‍यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक. अमरावती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पहिली भेट पोलीस भरतीत, नंतर एकाच ठिकाणी पोस्टिंग अन् वाढली जवळीक; आता पुण्यातील दोन महिला पोलीस करणार लग्न

Pune Katraj Ghat: कात्रज घाटात भाजपचे प्रचार साहित्य कचऱ्यात; झेंडे, टोप्या आणि मोदींच्या फोटोचे टीशर्ट आढळल्याने खळबळ

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Marathi News Live Updates : क्षुल्लक माणसे माझ्या प्रसिद्धीचा आधार घेऊ शकत नाहीत - कंगना रणौत

Phulambri News: आमदार होताच पहिल्याच निवेदनात मोठी मागणी; फुलंब्रीत छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार?

SCROLL FOR NEXT