Accident esakal
विदर्भ

Accident News: दिवसभर शेतात राबल्या, घरी जात असताना कारची धडक अन्... तीन शेतमजूर महिलांचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव शहरातील संजय गांधी सहकारी सूतगिरणी जवळील वळणावर रोडच्या कडेला उभ्या असलेल्या तीन शेतमजूर महिलांना भरधाव वेगात आलेल्या क्रेटा कारने चिरडले

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दरम्यान जळगाव शहरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

जळगाव शहरातील संजय गांधी सहकारी सूतगिरणी जवळील वळणावर रोडच्या कडेला उभ्या असलेल्या तीन शेतमजूर महिलांना भरधाव वेगात आलेल्या क्रेटा कारने चिरडले. या अपघातात आसलगाव येथील मायलेकीसह ६५ वर्षीय वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली.

शेतीची कामे आटोपून तीनही महिला रस्त्याने घरी जात असताना सूतगिरणी जवळील असलेल्या मोठ्या वळणावर या तीन महिला उभ्या असताना नांदुरा येथून भरधाव वेगात येत असलेल्या क्रेटा गाडी क्रमांक एम एच २८ ए झेड ३९९७ च्या गाडी चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून महिलांच्या अंगावर गाडी नेली.

या अपघातात तीनही महिला गंभीररीत्या जखमी झाल्या. स्थानिकांना धाव घेऊन त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे नेले. रुग्णालयात उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्यामधील नंदाबाई महादेव दांडगे वय ५० वर्ष व मुलगी वैष्णवी महादेव दांडगे वय १७ वर्षे या मायलेकीचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

तर बेबाबाई लक्ष्मण घोपे यांचेवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून खामगाव येथे रेफर करण्यात आले होते. खामगाव येथे नेत असताना वाटेतच त्‍यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT