File photo
File photo 
विदर्भ

अचलपूर विधानसभेवर बच्चू कडूंचाच वरचष्मा

राज इंगळे

अमरावती : अचलपूर मतदारसंघ बच्चू कडू यांनी खेचून घेतला तेव्हापासून या मतदारसंघावर बच्चू कडूंचेच वर्चस्व राहिले आहे. पुन्हा हा मतदारसंघ काबीज करण्याकरिता भाजप, कॉंग्रेस, शिवसेना यांच्यासह इतर पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी वेळोवेळी डावपेच आखत बच्चू कडूंना शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मतदारसंघावर सतत 15 वर्षांपासून बच्चू कडू यांचाच वरचष्मा राहिला आहे.
भाजप-कॉंग्रेस यांच्यासह इतरही पक्षांनी जंगजंग पछाडले तसेच वेळोवेळी वेगवेगळे डावपेच आखत शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या नेत्यांना ते जमले नाही. 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या अशोक बनसोड यांनी जोरदार लढत दिली. मात्र, तेसुद्धा मतदारसंघ काबीज करण्यात नाकाम राहिले. आता मात्र 2019 च्या निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळू शकते. कॉंग्रेसच्या वतीने बबलू देशमुख निवडणूक लढणार, हे निश्‍चित आहे. पण, राजेंद्र गवई यांनी कॉंग्रेसकडे अचलपूर, दर्यापूर या मतदारसंघांची तिकीट मागितल्याने व त्यातही अचलपूर विधानसभा संघात स्वतः निवडणुकीत उभे राहणार असल्याचे जाहीर केल्याने कॉंग्रेसचे बबलू देशमुख यांची डोकेदुखी वाढली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, युवा स्वाभिमान व आरपीआयची युती झाल्यास राजेंद्र गवईंना तिकीट मिळण्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, भाजपने अद्यापही उमेदवार समोर केला नाही. या वेळी भाजप-शिवसेनेचे कोणत्याही परिस्थितीत अचलपूर मतदारसंघ काबीज करण्याचे मनसुबे असल्याने उमेदवारी गजानन कोल्हेंना मिळण्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, पक्ष वेळेवर कोणाला तिकीट देईल, हेसुद्धातरी सांगता येत नाही. त्यामुळे भाजपमधील इच्छुक उमेदवार सावध भूमिका घेत आहेत. सोबतच सध्या भाजपकडून जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे हेसुद्धा भाजपची तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा सुरू आहे, तर युवा स्वाभिमानचे बंटी केजडीवाल हेदेखील रवी राणा यांच्या आशीर्वादाच्या प्रतीक्षेत आहेत. जर युवा स्वाभिमानने उमेदवार उभा केला तर सर्वप्रथम बंटी केजडीवाल यांचेच नाव प्रथमस्थानी राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र, सतत पंधरा वर्षांपासून मतदारसंघावर वरचष्मा असलेले बच्चू कडू यांनी अद्यापही पत्ते उघडलेले नाहीत. ऐनवेळी बच्चू कडू भूकंप घडून आणणार असल्याची जोरदार चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT