विदर्भ

चंद्रपुरात बाटली उभी; वर्धा जिल्ह्यावर दारूतस्करांची मदार

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी (liquor ban) होताच राजकीय पदाधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण हातमिळवणी करून तस्कर सक्रिय झाले होते. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात आता आडवी बाटली उभी झाल्याने तस्करांचा हिरमोड झाला आहे. आता केवळ वर्धा जिल्ह्यावरच (liquor sale in wardha district) मदार अवलंबून राहणार आहे. (Alcohol was smuggled from a luxury vehicle)

अनेक वर्षे आंदोलन करण्यात आल्यावर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. महिला वर्गासह सामाजिक संघटनांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले होते. बंदीमुळे दारूच्या व्यसनात बुडालेले वठणीवर येतील आणि संसाराची होणारी राखरांगोळी थांबेल, अशी अपेक्षा होती. मात्र, बिअरबार, दारूच्या दुकानांना टाळे लागताच अवैध दारूविक्रीला ऊत आला. कमी वेळात अधिक पैसे मिळविण्यासाठी अवैध व्यावसायिक सक्रिय झालेत.

राजकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून तस्करी सुरू केली. यासाठी चक्क महिला, मजूर वर्ग, विद्यार्थ्यांचा वापर केला. चंद्रपुरात यवतमाळ-वणीमार्गे बनावट दारू मोठ्या प्रमाणात जाऊ लागली. दुप्पट दराने दारूविक्री होत असल्याने मद्यपींनी बंदीबद्दल संतापही व्यक्त केला. उलट आधीपेक्षा बंदीत मोठ्या प्रमाणात दारूचे अड्डे सुरू झालेत. त्यामुळे चंद्रपुरातील दारूबंदी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

राज्य सरकारने चंद्रपुरात दारूची बाटली उभी करताच तस्करांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे. वर्धा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दारूबंदी आहे. मधील काळात वर्धेत जाणारी दारू मोठ्या प्रमाणात चंद्रपूर येथे जात होती. कळंब, राळेगाव, देवगाव, पुलगाव यासह चोरट्या मार्गाने वर्धेत आलिशान वाहनांतून दारू नेली जाते. त्यासाठी नवनवीन शक्कल लढविली जात असल्याचे अनेकदा छापेमारीतून पुढे आले आहे.

खेप पोहोचविण्यासाठी स्पर्धा

दारूतस्करांना आता एकमेव दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्याचा पर्याय उरला आहे.आधी चंद्रपूर व वर्धा असे चित्र होते. त्यात बदल झाल्याने दारूची खेप पोहोचविण्यासाठी तस्करांची स्पर्धा वाढणार आहे. या स्पर्धेतून रक्तपात घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. म्हणून संबंधित विभागाने विशेष खबरदारी घेत कारवाई करण्याची गरज आहे.

(Alcohol was smuggled from a luxury vehicle)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT