esakal | महिला दुकानदारावर ग्राहकाने केला बलात्कार; नागपुरातील जरीपटक्यातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दुकानदारावर बलात्कार; नागपुरातील जरीपटक्यातील घटना

महिला दुकानदारावर बलात्कार; नागपुरातील जरीपटक्यातील घटना

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : किराणा दुकान चालविणाऱ्या महिलेला वस्तीत राहणाऱ्या २६ वर्षीय ग्राहकाने जाळ्यात ओढले. तिला बगिच्यात आणि पुलाखाली अंधारात नेऊन केला. याप्रकरणी महिला दुकानदाराच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संगम गजभिये असे आरोपीचे नाव आहे. (Atrocities-committed-by-a-customer-on-a-female-shopkeeper)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय महिला रिया (काल्पनिक नाव) ही विवाहित आहे. तिला सात वर्षांचा मुलगा आहे. तिचा पती उच्चशिक्षित असून, त्याला अलीकडे दारूचे व्यसन लागले. त्यामुळे तो दुकान चालवून आलेल्या पैशातून दारू ढोसत होता. तसेच उधारीवर सामान देऊन त्या पैशाची ग्राहकाकडून दारू बोलवत होता. त्यामुळे रियाने पतीकडून दुकानाचा ताबा घेतला आणि स्वतः दुकान चालवायला लागली. त्यामुळे तिची आर्थिक स्थिती सुधारली.

हेही वाचा: दुर्दैवी! स्मशानभूमीत ७० मृतांच्या अस्थींची पोती बांधून

परंतु, पतीला काम नसल्यामुळे त्याचे दारूचे व्यसन कमी होण्याऐवजी वाढले. अशातच तिच्या दुकानात वस्तीत राहणारा संगम गजभिये हा उधारी घेत होता. तो नेहमीचा ग्राहक असल्यामुळे त्याच्याकडे बरीच उधारी झाली होती. रियाची कौटुंबिक स्थितीबाबत संगमला माहिती होते. त्यामुळे अविवाहित असलेल्या संगमने दुकानात चकरा मारणे सुरू केले.

रियाशी गोड गोड बोलत त्याने प्रथम मैत्री केली. त्याने तिचा मोबाइल क्रमांक घेतला आणि चॅटिंग करू लागला. दारुड्या पतीमुळे रियासुद्धा त्रस्त होती. त्याने तिला सोबत फिरायला येण्याची ऑफर केली. ती तयार झाली. १५ मे रोजी तिने लवकर दुकान बंद केले. संगम हा दुचाकी घेऊन तिच्या दुकानात आला. दोघेही फिरायला निघून गेले. त्याने तिला मानकापुरातील पुलाखाली नेले. तेथे त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच बळजबरी करीत बलात्कार केला.

हेही वाचा: Big News : रविवारपासून जीवनावश्‍यक दुकाने ‘अनलॉक’; १ जूनपर्यंत सूट

२२ मे रोजी तो पुन्हा दुकानात आला. रात्री साडेदहा वाजता त्याने तिला बाईकवर बसण्यास सांगितले. दयानंद पार्कजवळ अंधारात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा वस्तीत मोठ्या चवीने रंगायला लागली. त्यानंतर तो वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करीत असल्यामुळे रिया कंटाळली. त्यामुळे तिने जरीपटका पोलिस ठाण्यात संगमविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

(Atrocities-committed-by-a-customer-on-a-female-shopkeeper)