esakal | मुलगी नाही तर मुलगा झाला हो; क्रूर बापाकडून एक वर्षाच्या चिमुकल्याची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मुलगी नाही तर मुलगा झाला हो; क्रूर बापाकडून एक वर्षाच्या चिमुकल्याची हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावनेर (जि. नागपूर) : वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलीला गर्भातच मारलं जातं. इतकेच नाहीतर जन्म झाल्यानंतरही तिचा जीव घेतला किंवा पत्नीला मुलगी झाली म्हणून तिचा छळ केला जातो, अशा अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. पण, नागपुरात याउलट घटना समोर आली आहे. एका बापाला मुलगा नाहीतर मुलगी हवी. त्यामुळे मुलीच्या अट्टहासाठी बापानं टोकाचं पाऊल उचलत पोटच्या एक वर्षाच्या चिमुकल्याची दगडावर आपटून हत्या केली. नागपुरातील खापा पोलिस ठाण्याअंतर्गत (khapa police station nagpur) ही घटना घडली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (man killed his one year child in saoner of nagpur)

हेही वाचा: ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने दिली कोरोनाला मात; कधीही पडले नाही घराबाहेर

वाकोडी येथे आरोपी भजन मेहता कौरती(वय४०)राहतो. त्याने पत्नी मथुराला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावरून पती-पत्नी यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्या भांडणाध्ये मला मुलगी पाहिजे होती, पण तुला मुलगा झाला असं म्हणत निर्दयी बापाने चिमुकल्या मुलाला दगडावर एक नव्हे तर तीन -चारवेळा आपटले. यामध्ये त्या निरागस बालकाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पत्नीने खापा पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी पतीविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई ठाणेदार अजय मानकर करत आहेत.