मृत बिबट
मृत बिबट  
विदर्भ

गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये बिबट, अस्वलाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

नागपूर : गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमधील बिबट्याच्या छातीत झालेल्या जखमेमुळे हृदय आणि श्‍वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर उघडकीस आले. शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी त्याच्यावर गोरेवाडा परिसरातच अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये 3 सप्टेंर 2016 रोजी पाच बिबटे आणले होते. जुन्नर येथून या बिबट्याला आणले होते. तेव्हापासून बिबट्याचा मुक्काम येथेच होता. शुक्रवारी सकाळपर्यंत त्याची तब्येत चांगली होती. त्याने सकाळी मटणही खाल्ले. मात्र, सायंकाळी काहीच खाल्ले नसल्याचे सकाळी रेस्क्‍यू सेंटरचा कर्मचारी साफसफाईसाठी गेला असता लक्षात आले. पिंजऱ्याजवळ जाताच बिबट निपचित अवस्थेत आढळला. कर्मचाऱ्यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला पाचारण केले. डॉक्‍टरांच्या चमूने तपासणी करून तो मृत झाल्याचे घोषित केले. मात्र, कशामुळे मरण पावला हे कळत नव्हते. सर्पदंशाने तो मरण पावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृत्यू फुप्फुसाजवळ झालेल्या एका जखमेमुळे झाल्याचे उघड झाले. बिबट्याचे शवविच्छेदन महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे सहायक प्राध्याकपक डॉ. पी. एम. कोनकुसळे यांनी केले.
कारंजा घाडगे येथील अस्वलाचा मृत्यू
वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या अस्वलाला उपचारासाठी गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये आणण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी अस्वलाचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT