ankita pisudde arson case results on February 5 sakal
विदर्भ

बहुचर्चित अंकिता जळीतकांड प्रकरणाचा निकाल येत्या पाच फेब्रुवारीला

सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट : प्राध्यापिका अंकिता जळीतकांड प्रकरणात आज सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल येत्या 5 फेब्रुवारीला येणार असल्याची माहिती प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. आज सकाळी 11 वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश भागवत यांच्यासमोर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद सुरू झाला. दोन वाजता न्यायालयीन कामकाज पूर्ण झाले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे २९ साक्षीदार तपासण्यात आले.(ankita pisudde arson case results on February 5)

परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालय या प्रकरणाचा निकाल देईल असा विश्वास एडवोकेट उज्वल निकम यांनी या प्रकरणाचे कामकाज संपल्यानंतर पत्रकारांसोबत बोलतांना व्यक्त केला. प्राध्यापिका अंकिता हिची तीन फेब्रुवारी 2020 ला निर्घुण हत्या करण्यात आली होती.10 फेब्रुवारी 20 ला तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद देशात उमटले होते. अंकिता जळीतकांड प्रकरणात पोलिसांनी आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्यावर भारतीय दंड विधान नुसार आरोप निश्चित केले होते.

17 डिसेंबर 2020 ला या प्रकरणात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात कामकाज सुरु झाले. कोविड काळातही न्यायालयीन काम सुरु ठेवण्यात आलेले होते. सरकारी पक्षातर्फे एडवोकेट उज्वल निकम आणि एडवोकेट दीपक वैद्य’ यांनी भाग घेतला तर बचाव पक्षातर्फे एडवोकेट भूपेंद्र सोने, आड शुभांगी कोसारे, अवंती सोने आणि सुदीप मेश्राम यांनी सहकार्य केले. या प्रकरणात येत्या पाच तारखेला निकाल येणार असून या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

Mumbai: १० वर्षीय मुलीनं १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीवरून खाली फेकलं, गोरेगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Update : जुन्नर तालुक्यात खरीप पिकांचे पंचनामे आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT