आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनी गाठली आर्वी, घेतली झाडाझडती

आर्वी तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात
Health Director Archana Patil
Health Director Archana Patilsakal

आर्वी : देश भर गाजत असलेल्या येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी आरोग्य संचालनालय पुणेच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी शुक्रवारी (ता.२१) आर्वी गाठली असून येथल उपजिल्हा रुग्णालय व कदम हास्पीटलची दोन तास झाडाझडती घेतली. यावेळी त्यांचे सोबत वर्धा जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. सचीन तडस हे सुध्दा होते.(Minor Girl In Arvi)

Health Director Archana Patil
नाना पटोलेंच्या वक्तव्यातील 'गावगुंड मोदी' अखेर माध्यमांसमोर; मात्र...

येथील तेरा वर्षीय शाळकरी मुलीचे गर्भपात प्रकरण देशभर गाजत आहे. या प्रकरणी डॉ रेखा कदम, डॉ निरज कदम, मुलाचे आई वडील, दोन नर्स न्यायालयीन कोठडीत पोहचले आहे. तर, डॉ. कुमारसिंह कदम व डॉ. शैलजा कदम यांच्यावर नागपुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याने व ते वयोवृध्द असल्यामुळे अटके पासुन दुर आहे. या प्रकरणाची सखोल माहिती घेण्याकरीता आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील ह्या शुक्रवारी (ता.२१) सकाळी दहा वाजाताचे सुमारास येथे पोहचल्या. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाची संपुर्ण माहिती घेतली. अधिकाऱ्यांची मिटींग घेवुन त्यांना सुचना सुध्दा दिल्या. याशिवाय कदम हास्पीटलला भेट देवुन तेथील सोनोग्राफी मशीन, मानवी कवट्या व हाडे मिळालेल्या गोबर गॅस प्लँटची पाहणी केली.

उपजिल्हा रुग्णालयाचे प्रसुती व गर्भपात केंद्र वाऱ्यावर, रुग्णांची होत आहे परवड तेरा वर्षीय मुलीच्या गर्भपात प्रकरणा नंतर येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रसुती व गर्भपात केंद्र स्त्री रोग तज्ञाच्या अभावी बंद पडले असल्यामुळे रुग्णांना खाजगी दवाखाण्याचा सहारा घ्यावा लागत असुन त्यांचेवर २५ ते ५० हजार रुपयाचेवर भुर्दंड बसत आहे.

Health Director Archana Patil
ठरलं! उत्पल पर्रीकर पणजीतून अपक्ष लढणार

येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या स्त्री रोग तज्ञ डॉ वावरे यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे गत सात आठ दिवसा पासुन त्या रजेवर आहेत. तर, कंत्राटी पध्दतीने काम करीत असलेले डॉ. निरज कदम हे गर्भपात प्रकरणात सह आरोपी झाल्यामुळे न्यायालयीन कोठडीत पोहचले असुन त्यांना आरोग्य विभागाने कामावरुन काढले आहे. परिणामी येथील उपजिल्हा रुग्णालयात एकही स्त्री रोग तज्ञ कार्यरत नाही. यामुळे रुग्णांना शासकीय योजनेच्या लाभा पासुन तर वंचीत राहवे लागत आहे याशिवाय खाजगी रुग्णालयात २५ ते ५० हजार रुपयाचा भुर्दंड सहन करत उपचार करुन घ्यावे लागत आहे.

Health Director Archana Patil
शेततळ्यात पडून आईसह दोन चिमुकलींचा मृत्यू! पाथरीतील घटना

उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ उपलब्ध करुन द्या युवक काँग्रेसची मागणी उपजिल्हा रुग्णालयात एकही स्त्री रोग तज्ञ उपलब्ध नसल्यामुळे परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात अडचणीत आले असुन त्यांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. यात हजारो रुपयाचा आर्थीक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने आरोग्य प्रशासनाने त्वरीत स्त्री रोग तज्ञाची नेमणुक करुन रुग्णांची अडचण सोडवावी अशी मागणी तालुका युवक काँग्रेसच्यावतीन आरोग्य संचालीका अर्चणा पाटील यांना निवेदन देवून करण्यात आली. माजी नगर सेवक रामु राठी व तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल साबळे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com