विदर्भ

कुणी घर देता का घर...! 

अनिल दंदी

अकोला : मंजूर झालेल्या घरकुलाचा हप्ता देण्यास पंचायत समिती प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत बाळापूर तालुक्यातील कळंबी (महागांव) गटग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणाऱ्या कळंबी येथील लाभार्थ्याची प्रकृती बिघडली आहे. 

काल सोमवारी त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
कळंबी येथील विश्वनाथ महादेव ठाकरे यांना सन 2016 मध्ये घरकुल मिळाले होते. त्यांनी व्याजाने पैशे काढून घरकुलाचे बांधकाम सुरू केले. त्यानंतर घरकुलाचा हप्ता मिळविण्यासाठी 16 मार्च 2017 रोजी अर्ज सादर केला. मात्र घरकुल मंजूर होऊन जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर सुद्धा पंचायत समिती घरकुलाचा हप्ता देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे. 

पंचायत समितीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून नाकीनऊ आलेल्या लाभार्थ्याने 11 जुलै पासून कळंबी (महागांव) गटग्रामपंचायती समोर उपोषण सुरू केले. 
22 जून रोजी पंचायत समितीला उपोषणा बाबत निवेदन दिले असुन त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर आमरण उपोषण करण्यात आले. मात्र उपोषणाला सहा दिवस उलटूनही दखल घेतली नाही. दरम्यान उपोषणकर्त्याची प्रकृती खालवल्याने त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT