file photo
file photo 
विदर्भ

बजरंगदल पदाधिकाऱ्यांसह साथीदारांवर सशस्त्र हल्ला

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : दुचाकीची चावी काढल्याच्या संशयावरून शाब्दिक चकमकीनंतर चौघांनी बजरंगदलाच्या पदाधिकाऱ्यांसह त्याच्या एका साथीदारावर सशस्त्र हल्ला केला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (ता. 16) रात्री साडेअकराच्या सुमारास रुक्‍मिणीनगर येथील राठोड पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली.
विक्की सुनीलकुमार विराणी (वय रा. रामपुरी कॅम्प) व निरंजन मोहनलाल दुबे (वय ) अशी हल्ल्यातील जखमींची नावे आहेत.
जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विक्की व त्याचा साथीदार असे दोघे शुक्रवारी रात्री पेट्रोल भरण्यासाठी रुक्‍मिणीनगर येथील राठोड पेट्रोलपंपावर पोहोचले. त्याचवेळी आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी नमूद दोघांसोबत त्यांच्या वाहनाची चाबी काढल्याच्या कारणावरून आधी वाद घातला. त्यानंतर मारहाण केली. लोखंडी वस्तूने हल्ला करून चौघांनी पळ काढला.
विराणी यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी चार अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शनिवारपर्यंत (ता. 17) त्यापैकी कुणालाही अटक झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ल्याच्या घटनेनंतर, पेट्रोलपंप परिसरात, आसपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज फ्रेजरपुरा पोलिसांनी तपासले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT