वैरागड : आपल्या मोडक्‍या झोपडीपुढे उभे बळीराम जांगळे.
वैरागड : आपल्या मोडक्‍या झोपडीपुढे उभे बळीराम जांगळे. 
विदर्भ

बळिराम जांगळे अद्याप घरकुलाच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा

वैरागड (जि. गडचिरोली) : येत्या 2022 पर्यंत प्रत्येक गरिबाला घरकुल योजनेचा लाभ देण्याचे प्रधानमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. परंतु कुरखेडा तालुक्‍यातील गुरनोली येथील बळिराम रामदास जांगळे यांना घरकुलाचा लाभ न मिळाल्याने अजूनही कच्च्या घरातच वास्तव्यास आहेत.
ज्यांचे बीपीएल यादीत नाव असेल, अशा लाभार्थ्यांना पूर्वी घरकुलाचा लाभ मिळत असे. त्यामुळे पात्र असूनही अनेक लोकांना घरकुलाच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. परंतु आता ज्यांचे कौलारू घर असेल, मातीचे, कुडाचे किंवा कच्च्या विटांचे असेल, अशा लाभार्थ्यांना सरसकट घरकुलाचा लाभ देण्याचे प्रधानमंत्र्यांनी जाहीर केले. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजना तयार केली आहे. परंतु, कुरखेडा तालुक्‍यातील गुरनोली येथील जांगळे या अल्पभूधारक शेतकऱ्याचे घर मातीचे व कौलारू आहे. पावसाळ्यात जागोजागी गळत असल्याने घरावर झाकण्यासाठी पाल घ्यावे लागत असल्याने आर्थिक झळ सोसावी लागते. अनेकांना पक्‍के घर असूनही घरकुलाचा लाभ मिळाला आहे. परंतु, पात्र असूनही जांगळे यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांना आपल्या मोडक्‍या, कच्च्या घरातच दिवस कंठावे लागत आहेत.
खोट्यांना लाभ, खरे वंचित
सरकारने दारिद्य्ररेषेखालील नागरिकांना अनेक सवलती व विविध योजनांचे लाभ दिले आहेत. पण, काहीजणांनी आर्थिकदृष्ट्या सधन असतानाही दारिद्य्ररेषेखालील अर्थात बीपीएल यादीत आपले नाव चढविले आहे. असे नागरिक घरकुल व इतर अनेक योजनांचा लाभ घेत आहेत. अशा खोट्यांना लाभ मिळत असताना खरे गरीब नागरिक लाभापासून वंचित आहेत. जिल्हाभरात अशी अनेक प्रकरणे असून, याची व्यापक चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT