विदर्भ

पीएसआयसह पाच पोलिसांना मारहाण; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सकाळवृत्तसेवा

नागपूर - गेल्या दोन दिवसांत एका महिला पोलिस उपनिरीक्षकांसह चौघांना वाहनचालकांनी मारहाण केल्याच्या घटनेमुळे खाकीच्या इज्जतीची लक्‍तरे वेशीवर टांगली गेली आहेत. सदर, मानकापूर, गणेशपेठ आणि हुडकेश्‍वर हद्दीत पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना समोर आल्याने पोलिस आयुक्‍तांना पुन्हा एकदा कडक धोरण अवलंबविण्याची गरज आहे. खाकी वर्दीला भ्रष्टाचाराची कीड लागल्याने ऑटोचालक तसेच वाहनचालक वर्दीवर हात घालायला लागले आहेत.

पहिली घटना 
वाहतूक शाखेचे किशोर धपके व प्रकाश सोनोने जामर कारवाई पथकात आहेत. बुधवारी गणेशपेठ बसस्थानकाजवळील हॉटेल राहुल डिलक्‍सजवळ पोलिसांनी ऑटोचालक सोनू कांबळे (रा. बेलतरोडी) व मयूर राजूरकर (रा. रामबाग) यांच्या ऑटोंना जामर लावले. पोलिस निरीक्षकाशी ‘अर्थपूर्ण’ संबंध जोपासत असलेल्या ऑटोचालकांनी पोलिसांना जामर काढण्यास सांगितले. त्यांनी नकार देताच दोन्ही ऑटोचालकांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

घटना दुसरी
हुडकेश्‍वरातील गजानननगरात कौटुंबिक वादातून मारहाण होत असताना पोलिस कर्मचारी प्रमोद घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी युवक धीरज रमेश बांगर याने पोलिस शिपाई प्रमोद यांच्या कानाखाली वाजवली. त्यांनी लगेच हुडकेश्‍वर ठाण्याच्या ड्यूटी अधिकारी महिला पोलिस उपनिरीक्षकाला कॉल केला. महिला पीएसआयसह तीन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अन्य आरोपी नीरज रमेश बांगरे (३२), वर्षा नीरज बांगरे आणि रजनी रमेश बांगरे (६०, सर्व रा. दर्शन कॉलनी, नंदनवन) यांनी महिला उपनिरीक्षकाचे केस पकडून मारहाण केली. त्यांना वाचविण्यासाठी आलेल्यांना आरोपींनी मारहाण केली.  

घटना तिसरी
रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांना हटकले म्हणून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केल्याची घटना मानकापूर हद्दीत फरस गेटसमोरील वॉव बेकरीसमोर घडली. परिसरात सुरू असलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर आरोपी वीरेंद्र दिनेश काळबांडे (२६, रा. गोधनी) याने साथीदारांसह दारू ढोसली. रस्त्यावरच एकमेकांना मारहाण करून दुकानांवर दगडफेक केली. त्याचवेळी कोतवाली ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या वाहनाचा चालक पोलिस शिपाई गौतम त्यांना घ्यायला जात होता. आरोपी दुकानांवर दगडफेक करीत असल्याचे पाहून गौतमने त्यांना हटकले. त्यामुळे आरोपी संतापले आणि त्यांनी पोलिस वाहनावरच दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या. शिपाई विकास यादव (३०) यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून वीरेंद्र काळबांडे यास अटक केली.

चौथी घटना
मंगळवारी दुपारी एकला संविधान चौकात वाहतूक शाखेच्या चेम्बर एकचे पोलिस हवालदार नीलेश चौधरी ड्यूटीवर होते. त्यांनी विना हेल्मेटने दुचाकी चालविणारा मोहम्मद मोबीन अन्सारी (वय ३५, शफीनगर, मोमिनपुरा) याला अडविले. त्याला हेल्मेटचे चालान करणार असल्याचे सांगितले. मो. मोबिनने पोलिसांना चालान बनविण्यास होकार दिला. मात्र, लगेच हवालदाराने त्याला वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली. त्यानंतर दुचाकीची चावी काढून त्याला मागे फिरवले. चौधरी हे वाहनाचे कागदपत्र दाखविण्यासाठी अडून होते. चिडलेल्या मोबीनने हवालदाराच्या तोंडावर जोरदार ठोसा लगावला. त्यानंतर वर्दी फाडून बदडण्यास सुरुवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT