three died while cleaning the sewage tank three died while cleaning the sewage tank
विदर्भ

वेकोलिच्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू; गटार सफाई करताना दुर्घटना

सकाळ डिजिटल टीम

राजुरा (जि. चंद्रपूर) : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती-धोपटाळा टाउनशिप येथे गटाराची टाकी साफ (sewage tank) करताना वायूमुळे गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना मंगळवारी (ता. २२) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. राजू जंजर्ला (४२, रा. बल्लारपूर), सुभाष खंडाळकर (५२, रा. धोपटाळा) व सुशील कोरडे (२८, रा. गोवरी कॉलनी) अशी मृतांची नावे आहेत. एका कामगारास उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले. तर उर्वरित दोन कामगारांवर चंद्रपुरात उपचार सुरू आहेत (three died while cleaning the sewage tank)

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळी काही कंत्राटी कामगार आणि वेकोलिचे काही कामगार दहा फूट खोल असलेली टँक साफ करण्यासाठी उतरले होते. बराच वेळ होऊनही ते परत आले नाही. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी खाली हाक दिली. मात्र, कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंपनीचा एक कर्मचारी टँकमध्ये उतरला. मात्र, तोही वर आला नाही. त्याला हाक दिली; पण त्याच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे तेथे उपस्थित असलेले कामगार घाबरले. त्यांनी शेजारच्या लोकांना या घटनेची माहिती दिली. यानंतर तातडीने टँकवरील स्लॅब जेसीबीच्या मदतीने काढली. यावेळी तीन कंत्राटी कामगार व एक वेकोलि कामगार बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. त्यांना बाहेर काढण्यासाठी रामपूर ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी शंकर आंदगुला खाली उतरले. उपस्थितांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढण्यात आले.

जखमी मजुरांना रुग्णालयात नेले असता पाच ते सात मिनिटांनी शंकर आंदगुला हेही बेशुद्ध पडले. त्यांना वेकोलिच्या रुग्णालयातही नेण्यात आले. या घटनेत एकूण पाच कामगार सापडले आहेत. यात राजू जंजर्ला आणि सुभाष खंडाळकर या दोन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला. वेकोलिचे कामगार सुशील कोरडे यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. वेकोलि कर्मचारी प्रमोद वाभिटकर, रामपूर गावातील कंत्राटी सफाई कामगार शंकर आंदगुला यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार (Three injured) सुरू आहेत.

एकाही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही

एवढी मोठी दुर्घटना घडूनही, बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक यांचे कार्यालय अगदी जवळ असताना वेकोलिच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला किंवा रुग्णालयात भेट दिली नाही. मात्र, वेकोलिच्या कामगार संघटनांनी घटनास्थळी भेट देत मदतकार्यात सहभाग घेतला. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी जखमींची जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. त्यांची विचारपूस केली.

आर्थिक मदतीची मागणी

वेकोलिच्या क्षेत्रीय रुग्णालयात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही. वेकोलिच्या कार्यप्रणालीवर आरोप करीत दोषींवर कारवाई तसेच दुर्घटनेतील पीडितांना आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर गोळीबारचा थरार, तरूणाने स्वत:वरच गोळी झाडून घेतली

Beed News: दुष्काळी मातीत फुलला रेशमी स्वप्नांचा मळा; बीडचा पॅटर्न देशभर हिट; उत्तराखंड, झारखंड आणि कर्नाटकपर्यंत तुती रोपांचा पुरवठा

SCROLL FOR NEXT