दिल्लीत राजकीय ‘नायक’; गटार साफ केल्यानंतर नेत्याची दुधाने आंघोळ

Leaders milk bath
Leaders milk bathLeaders milk bath

नवी दिल्ली : दिल्लीत महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत आम आदमी पक्षाच्या नगरसेवकाने नायक चित्रपटातील एका दृश्याची पुनरावृत्ती केली. नेत्याने नाल्यात उडी मारून साफसफाई केली. ते बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांना दुधाने आंघोळ (Leaders milk bath) घातली. नगरसेवक हसीब उल हसन असे आपच्या (Aap) नेत्याचे नाव आहे. (Leaders milk bath)

आम आदमी पक्षाचे (AAP) नगरसेवक हसीब-उल-हसन हे पाहणीसाठी पूर्व दिल्लीत पोहोचले. यावेळी त्यांना एका ठिकाणी पाणी भरले आणि त्यातून दुर्गंधी येत असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी फावडे घेऊन खड्ड्यात उडी मारली आणि साफसफाई सुरू केली. प्रसारमाध्यमे येताच लोकांचीही गर्दी झाली होती. नाला साफ करताना त्यांनी भाजपला टोला हाणला.

Leaders milk bath
अमरावती : ‘द काश्मीर फाइल्स’ बघितल्यानंतर तणावसदृश परिस्थिती

शास्त्री पार्कमध्ये भाजपचे समुपदेशक आहेत. भाजपचे (BJP) एकमेव खासदार आहे. परंतु, हे लोक काहीच काम करत नसल्याने लोकांना घाणीत राहावे लागत आहे, असे नाला साफ करताना हसीब उल हसन मीडियाशी बोलत होते. नाल्याची सफाई करण्यासाठी अनेकवेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा करूनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे स्वत: फावडे घेऊन नाला साफ करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय नाटक

ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच भाजपचे नेतेही सक्रिय झाले. माध्यमांशी फोनवर बोलताना भाजप (BJP) नेत्यांनी या घटनेचे वर्णन राजकीय नाटक असल्याचे सांगितले. दिल्लीत कुठेही पाणी साचले तर त्याची जबाबदारी दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या पूर विभागाची आहे, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com