File photo
File photo 
विदर्भ

सीसीटीव्ही बोलणार अन्‌ अलार्मही देणार

मंगेश गोमासे

सीसीटीव्ही बोलणार अन्‌ अलार्मही देणार
नागपूर : हेल्मेट घालून किंवा तोंडावर कपडा बांधून चोरीचा प्रयत्न केल्यास चोरट्यांशी बोलणारा आणि त्याने प्रतिसाद दिला नाही तर अलार्म बाजवणारा सीसीटीव्ही कॅमेरा व्हीएनआयटीच्या इलेक्‍ट्रानिक्‍स ऍण्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या बी. टेक. अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी शोधून काढला आहे. तसेच "न्यू वे इनोव्हेशन' या नावाने "स्टार्टअप'सुद्धा सुरू केले आहे.
सुरक्षेसाठी आज जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. मात्र, घटना घडल्यानंतरच रेकॉर्डिंगसाठीच ते कामी येतात. सीसीटीव्हीमध्ये असलेला "सीडीआर' वापरून पोलिस गुन्हेगारांपर्यंत पोहोचताच. त्यामुळे हुशार झालेले चोरटे आता सीसीटीव्हीमधील सीडीआरही चोरून नेतात. काहीतर सीसीटीव्ही कॅमेरेच लंपास करतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील त्रुटी लक्षात आल्यानंतर त्यात "इनोव्हेशन' करण्याचे शुभम कान्हेरे, इशा सागोटे, शिभाली हस्ते, आयआयटी पटना येथील मिथिलेश हिंगे यांनी ठरविले. त्यात नवे फिचर्स टाकून त्याला अधिक प्रभावी करण्याचे काम चौघांनीही केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चेहरा तपासून त्याची माहिती ऍपवर देणे, व्यक्तीला चेहऱ्यावरील रुमाल वा हेल्मेट काढण्याची सूचना देणे आणि विशिष्ट हालचाल झाल्यास अलार्म वाजविणे असे अनेक फिचर्स या कॅमेऱ्यामध्ये टाकण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ऍपमध्ये असलेल्या टॉकिंग सिस्टममधून मोबाईलवर कॅमेऱ्यासमोर असलेल्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधणे आणि त्याचे ऐकूनही घेता येणे शक्‍य होणार आहे. त्याचप्रमाणे सामान्य कॅमेऱ्याप्रमाणे रेकॉर्डिंगचीही सोय यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाला त्यांनी "अरवीस' (आर्टिफिशली रिइन्फोर्स व्हीजन फॉर इन्फॉरमेशन ऍण्ड सर्व्हिलन्स) असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाचे प्रेझेंटेशन नागपूरच्या पोलिस आयुक्तासंह विविध कंपन्या आणि संस्थांसमोर देण्यात आले आहे. लवकरच ते उत्पादन म्हणून बाजारात विकण्यासाठी येणार आहे.
असे आहे संशोधन
विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ऍप विकसित केले. "इंटेलिजन्स रेकॉर्डिंग'च्या माध्यमातून कॅमेऱ्यामध्ये स्पीकरद्वारे समोरच्या व्यक्तीला "अलर्ट' देत, व्यक्तीने चेहऱ्यावर काही बांधले वा हेल्मेट घातले असल्यास त्याची ओळख देण्याची सूचना कॅमेरा करेल. निश्‍चित वेळेत ती माहिती न आल्यास आपोआप अलार्म वाजेल. विशेष म्हणजे हे सर्व "फुटेज' ऍपवरून मोबाईल वा ई-मेलवर तत्काळ जाईल. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने कॅमेऱ्याचा सीडीआर चोरण्याचा वा तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी, तो पुराव्यासाठी सुरक्षित राहील. कॅमेऱ्यामध्ये लाइव्ह फीड असल्याने ऍपच्या माध्यमातून कॅमेऱ्यासमोर असलेल्या व्यक्तीशी बोलता येणे शक्‍य होईल. स्नॅपशॉटमुळे व्यक्तीची प्रतिमा मिळणे शक्‍य होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT