Dead Leopard Found in Gondia on next day gondia marathi news 
विदर्भ

ब्रेकिंग! सलग दुसऱ्या दिवशी एकाच शेतात आढळला डोके व समोरचे दोन पंजे नसलेल्या बिबट्याचा मृतदेह; वनविभाग चिंतेत

मुनेश्‍वर कुकडे

गोरेगाव (जि. गोंदिया) : गोरेगाव वनपरिक्षेत्रातील इंदिरानगर, तिल्ली मोहगाव येथील शेतातील विहिरीत बिबट्याचा (नर) मृतदेह रविवारी (ता. ३) सकाळी आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र, सोमवारी (ता. ४) दुपारी १२ वाजताच्या सुमारास पुन्हा याच शेतात ५० मीटर अंतरावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या घटनेमुळे वनविभागासमोर शिकार की अन्य कारणाने बिबट्याचा मृत्यू झाला, याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

इंदिरानगर, तिल्ली मोहगाव येथील देवचंद सोनवाने यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत बिबट्याचा मृतदेह रविवारी आढळला होता. मृतदेह बाहेर काढल्यानंतर बिबट्याच्या समोरील पायाचे दोन्ही पंजे गायब असल्याचे समोर आले. त्यानंतर परिसरात पाहणी केल्यावर एका निलगायीचे डोके व पाय कुजलेल्या अवस्थेत वेगवेगळ्या जागेवर आढळून आले होते.

या घटनेची शाई वाळते न वाळते तोच सोमवारी (ता. ४) दुपारी १२ वाजताच्या सुमारास ५० मीटर अंतरावर बिबट्याचा मृतदेह आढळला. या बिबट्याचे डोके व समोरचे दोन पंजे गायब असल्याचे वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिसले. या बिबट्याचा १५ दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

एकापाठोपाठ दुसऱ्या बिबट्याचा मृतदेह सापडल्याने वनविभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. उल्लेखनीय म्हणजे, या परिसरात वन्यप्राण्यांची यापूर्वी शिकार झाली आहे. माहितीवरून गोरेगाव येथील वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीवरून बिबट्याची शिकार झाली असावी, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

शिकार की अन्य कारणाने बिबट्याचा मृत्यू

गोरेगाव वनपरिक्षेत्रातील इंदिरानगर, तिल्ली मोहगाव येथील शेतातील विहिरीत बिबट्याचा (नर) मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या बिबट्याचे समोरचे दोन पंजे गायब असल्याने शिकार झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. शेतातील विहिरीत बिबट्याचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती एका व्यक्तीने वनविभागाला दिली होती. आज पुन्हा शेतात ५० मीटर अंतरावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या घटनेमुळे वनविभागासमोर शिकार की अन्य कारणाने बिबट्याचा मृत्यू झाला, याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT