पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन 

संतोष ताकपिरे 
Saturday, 2 January 2021

एक सुटकेससह दोन मोठे खोके असे तीन पार्सल होते. त्या पार्सली शंभर किलो वजनाच्या असल्याचे सांगून, सदर प्रवाशाने तसे भाडेपावतीही तयार केली. मात्र अमरावती बसस्थानकात बस पोहोचताच सर्वांचा थरकाप उडाला. 

अमरावती : संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पुणे येथून नागपूरला जाण्यासाठी निघाली. सदर बस ही नागपूर आगाराची आहे. पुणे बसस्थानकावरूनच त्या बसमध्ये एक प्रवासी बसला. त्याच्या सोबत एक सुटकेससह दोन मोठे खोके असे तीन पार्सल होते. त्या पार्सली शंभर किलो वजनाच्या असल्याचे सांगून, सदर प्रवाशाने तसे भाडेपावतीही तयार केली. मात्र अमरावती बसस्थानकात बस पोहोचताच सर्वांचा थरकाप उडाला. 

नक्की काय घडलं 

शिवशाही लक्झरी बस शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुणे येथून नागपूरला जाण्यासाठी निघाली. सदर बस ही नागपूर आगाराची आहे. पुणे बसस्थानकावरूनच त्या बसमध्ये एक प्रवासी बसला. त्याच्या सोबत एक सुटकेससह दोन मोठे खोके असे तीन पार्सल होते. त्या पार्सली शंभर किलो वजनाच्या असल्याचे सांगून, सदर प्रवाशाने तसे भाडेपावतीही तयार केली. जी व्यक्ती तीनही डाकसोबत कागदपत्रे घेऊन पुणे येथून बसला तो प्रवासी अकोल्यात उतरला. त्यानंतर दुसरी व्यक्ती अमरावतीपर्यंत येण्यासाठी त्याच शिवशाही मध्ये बसली. 

अधिक वाचा - सहा महिन्याच्या मुलीला मोठं करण्याचं 'त्याचं' होतं स्वप्नं पण अचानक अधूर झाला रस्ता अन् सगळंच संपलं

दुसरा व्यक्ती अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात उतरला. त्यानंतर अमरावती येथून पंकजसिंग सुधीरसिंग तोमर (वय २५, रा. डोडरी, जि. मुरैना, मध्यप्रदेश) हा युवक त्याच पार्सलसोबत अमरावती बसस्थानकावरून नागपूरला जाण्यासाठी बसला. ही शिवशाही बस आज अमरावती पोहचली. एकाच पार्सलसाठी तीन व्यक्तींची अदलाबदल झाल्यामुळे बसचे दोन चालक व वाहकांना संशय आला. त्यांनी सदर बॉक्समध्ये काय आहे. याची विचारणा पंकजसिंगकडे केली. त्याने त्यात प्लॅस्टिकचे सामान असल्याचे सांगितले. परंतु चालकाने एक बॉक्स उघडला असता, त्यात चांदीची भांडी आढळली. त्यामुळे उर्वरित दोन बॉक्स न उघडताच चालक वाहकाने शिवशाही बस फ्रेजरपुरा ठाण्यात आणली. 

आयकर विभागाला कळविले

या घटनेनंतर पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी नागपूर येथील आयकर (दक्षता) विभागाच्या अधिका-यांना माहिती दिली. आयकरची एक चमु तीनही बॉक्समध्ये नेमके काय आहे हे तपासण्यासाठी सायंकाळी अमरावतीत दाखल झाली.

दोन बॉक्समध्ये नेमके काय? 

तीनपैकी एका पार्सलमध्ये चांदी आढळली. परंतु उर्वरित दोन पार्सल आयकर विभागाची चमु यायची असल्याने पोलिसांनी उघडले नाहीत. त्यामध्ये नेमके आहे तरी काय? ही बाब सायंकाळपर्यंत स्पष्ट झाली नव्हती.

पार्सलच्या मालकाचा शोध सुरू

पुणे येथून शिवशाही बसने येणा-या पार्सली नागपूर येथील व्यक्तीच्या असल्याचे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. परंतु पंकजसिंग तोमर यालाही पार्सलच्या मुळ मालकाचे नाव माहिती नव्हते. तो कुरिअर सव्र्हीसमध्ये काम करीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 

जाणून घ्या - 'त्यांच्या' गाडीचा हॉर्न ऐकताच महामार्गावर जमतात असंख्य कावळे; याला दातृत्व म्हणावं की मैत्री

चालक, वाहकांची सतर्कता

पुणे ते नागपूर या शिवशाही बसमध्ये उमेश बावनकर, मुकेश हुकरे हे दोन चालक तर, प्रशांत सनेश्वर व मोहन पडोळे हे दोन वाहक होते. त्यांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी त्यांचे बयाण नोंदविले. आयकर विभागाची चमुही त्यांचे बयाण घेणार आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unknown box found in Pune Nagpur Shivshahi bus in Amravati Latest News