esakal | शेतातील विहिरीत तरंगतांना दिसला बिबट्याचा मृतदेह; बाहेर काढताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप 
sakal

बोलून बातमी शोधा

Dead Leopard Found in Well in Goregaon Gondia District Latest Marathi News

इंदिरानगर, तिल्ली मोहगाव येथील देवचंद सोनवाने यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत बिबट्याचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती एका व्यक्तीने वनविभागाला दिली.

शेतातील विहिरीत तरंगतांना दिसला बिबट्याचा मृतदेह; बाहेर काढताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप 

sakal_logo
By
मुनेश्‍वर कुकडे

गोरेगाव ( जि. गोंदिया) : गोरेगाव वनपरिक्षेत्रातील इंदिरानगर, तिल्ली मोहगाव येथील शेतातील विहिरीत बिबट्याचा ( नर) मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या बिबट्याचे समोरचे दोन पंजे गायब असल्याने शिकार झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

अधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

इंदिरानगर, तिल्ली मोहगाव येथील देवचंद सोनवाने यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत बिबट्याचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती एका व्यक्तीने वनविभागाला दिली. या माहितीवरून गोरेगाव येथील वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता, बिबट्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला असावा, असा कयास लावण्यात आला. 

त्यानंतर उपवनसंरक्षक कुलराजसिंग, सहायक वनसरंक्षक एस. एस. सदगीर, मानद वन्यजीवप्रेमी मुकुंद धुर्वे, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.मालापुरे व डाॅ. विवेक गजरे यांच्या उपस्थितीत बिबट्या विहिरीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी बिबट्याच्या समोरील पायाचे दोन्ही पंजे गायब असल्याचे समोर आले. त्यानंतर परिसरात पाहणी केल्यावर एका निलगायीचे डोके व पाय कुजलेल्या अवस्थेत वेगवेगळ्या जागेवर आढळून आले. 

क्लिक करा - बाप रे! प्रचंड डोकेदुखी असल्यानं डॉक्टरकडे गेली महिला; शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूतून निघाला टेनिसबॉलच्या आकाराचा गोळा

या परिस्थितीवरून बिबट्याची शिकार झाली असावी, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, बिबट्याचे शवविच्छेदन करून मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यात आले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी दिली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image