File photo
File photo 
विदर्भ

खुर्सापार जंगलात वाघाच्या बछड्याचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

नागपूर (देवलापार) : येथून नजीकच असलेल्या मानसिंगदेव अभयारण्यात वाघाच्या एका वर्षाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सहादरम्यान उघडकीस आली. त्या बछड्याचे अक्षरशः चार ते पाच तुकडे आढळल्याने विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. देवलापार मानसिंगदेव अभयारण्य आहे. येथून बारा किलोमीटर अंतरावर खुर्सापार प्रवेशद्वार आहे. गुरुवारी सकाळी देवलापार मानसिंगदेव अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण साठवणे व क्षेत्रसहायक जीवन पवार हे सकाळी गस्तीवर असताना त्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी परिसराची पाहणी केली. त्यांना वाघाच्या बछड्याचा पाय दिसून आला. दुसरीकडे त्याचे धड, काही दूर अंतरावर मान व जबडा तर एका ठिकाणी त्याच्या शरिराचा अर्धवट भाग आढळला. तुकडे तुकडे झाल्याने त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा आहे.
अवनीचा बछडा?
मृत बछड्याचे अवयव साबूत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी साठवणे सांगतात. मोठ्या वाघाने त्याच्या परिसरात आल्यामुळे बछड्याला मारले असावे असे सांगून याबाबतची माहिती साठवणे यांनी वनसंरक्षक गोवेकर यांना सकाळी सातला दिल्याचे सांगितले. परंतु, गोवेकर चार वाजता गेटवर पोहोचले व त्यांनी स्थानिक वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींना घटनास्थळावर येऊ दिले नाही. त्याचप्रमाणे पाच वाजूनही उत्तरीय तपासणीकरिता डॉक्‍टर पोहोचले नसल्याने पुढील कार्यवाही थांबली. उत्तरीय तपासणी होणार की नाही, याबाबत माहिती देण्याचे त्यांनी टाळले. दरम्यान, मृत बछडा अवनीचा असल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूने गमावली तिसरी विकेट! आक्रमक खेळणारा रजत पाटिदार आऊट, अर्धशतकही हुकलं

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT