उमरेड ः परतीच्या पावसाने जमीनदोस्त झालेले पीक.
उमरेड ः परतीच्या पावसाने जमीनदोस्त झालेले पीक.  
विदर्भ

ओला दुष्काळ जाहीर करा; अन्यथा रस्त्यावर उतरू 

सकाळ वृत्तसेवा

उमरेड(जि.नागपूर) : यंदाच्या पावसाळी हंगामात पावसाने दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी केली. जुलै ते ऑक्‍टोबरदरम्यान उमरेड तालुक्‍यात सरासरी 1099.33 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतर दिवाळीच्या धामधुमीत परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी दिला. 
दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुसळधार पाऊस पडला. या दिवशी 16.11 मिमी नोंद करण्यात आली. या परतीच्या पावसामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट दिसू लागलेत. नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर लगेच सुरू झालेल्या दिवाळीमुळे कृषी विभागासोबतच महसूल विभागाचे कामकाज बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली. तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी 25 ते 27 ऑक्‍टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमाल नुकसानीचा प्राथमिक अहवाल देऊन माहिती पुरविली. धानाचे पीक एकूण 74 गावांमध्ये एकूण 170 हेक्‍टर क्षेत्रात पावसामुळे नुकसान झाले. त्यापैकी 140 हेक्‍टरमध्ये 33टक्‍क्‍यांच्या आत नुकसान झाले. 30 हेक्‍टरांतील धान पिकाचे 33 टक्‍केपेक्षा अधिक नुकसान झाले, असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. धानाची एकूण लागवड 1708 हेक्‍टर क्षेत्रात केली असून कापूस-23169 तर सोयाबीन-14546 हेक्‍टर क्षेत्रात घेतले असून सोयाबीन व कापसाचे नुकसान निरांक दर्शविले आहे. प्रत्यक्ष पंचनामे लवकरच सुरू केले जातील, असे तालुका कृषी अधिकारी म्हणाले. 
जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मालाची हानी भरून काढण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा अशा विनंतीचे निवेदन राज्यपालांना सादर करण्यात येईल. त्या मंडळात बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हजर राहतील. याशिवाय राज्यातील सर्व नवनियुक्त आमदार हजर राहतील. त्यानंतर शासनाच्या वतीने मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत तर मग आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू. 
राजेंद्र मुळक 
माजी मंत्री, अध्यक्ष, नागपूर ग्रामीण कॉंग्रेस कमिटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT