dharamrao baba atram says vijay wadettiwar meets chandrashekhar bawankule to join bjp political party
dharamrao baba atram says vijay wadettiwar meets chandrashekhar bawankule to join bjp political party  Sakal
विदर्भ

वडेट्टीवार, आत्राम यांच्यातील कलगीतुरा थांबेना; भाजप प्रवेशासाठी मुंबई विमानतळावर बैठक झाल्याचा धर्मरावबाबांचा गौप्यस्फोट

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कथित भाजप प्रवेशावरून ते व राज्याचे अन्न, औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम या दोघांत रंगलेला कलगीतुरा थांबायचे नाव घेत नाही.

आज गुरुवारी (ता. १८) धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी येथे पत्रकार परिषद घेऊन वडेट्टीवार मंत्री असतानाच ते, मी व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई विमानतळाच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट केला.

आत्राम यांनी सांगितले की, वडेट्टीवार मंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे, मी आणि वडेट्टीवार यांची मुंबई विमानतळावर टर्मिनल १ वर भेट झाली. यावेळी आम्ही रिझव्हर्ड लॉनमध्ये गेलो. तेथे वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली.

त्यानंतर वडेट्टीवारांनी पक्ष प्रवेशासाठी वेळही मागून घेतला. या बैठकीला आमच्या तिघांचेही स्वीय सहायक होते. ही बाब शंभर टक्के खरी असून नार्को टेस्ट करायची तर माझी व विरोधी पक्षनेत्याचीही करा, असे आव्हान त्यांनी दिले.

वडेट्टीवार तेव्हा मंत्री होते. तरीही त्यांना भाजप प्रवेशाची घाई होती. तसेच वडेट्टीवार हे ४ जूननंतर भाजपमध्ये नक्की प्रवेश करतील, असाही दावा आत्राम यांनी ठामपणे केला. एका प्रचार सभेत वडेट्टीवारांनी आत्राम यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्यामुळे हा वाद सुरू झाला होता आणि त्यातूनच त्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले.

वडेट्टीवार म्हणतात - तिघांचीही नार्को करा

दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आत्राम यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, केवळ आम्हा दोघांचीच नाही, तर माझी, मंत्री आत्राम यांची व भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे अशा तिघांचीही नार्को टेस्ट करावी.

मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून माझा भाजप प्रवेश मुळीच शक्य नाही. आत्राम यांनी त्यांच्याकडे कुठले पुरावे आहेत, ते दाखवावे. अन्यथा मी जर त्यांचे काही वैयक्तिक खुलासे केले तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल. एवढे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही वडेट्टीवारांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: सकाळी 11 वाजे पर्यंत देशभरात 23.66 टक्के मतदान, महाराष्ट्र सर्वात मागे

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT