Metadore 
विदर्भ

काय, मेटॅडोर झाडावर चढला! होय हे खरे आहे; वाचा पुढे कसे ते... 

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : डिझेल संपल्याने पंप मारत असताना मेटॅडोर अचानक सुरू होऊन समोरील झाडावर चढला. या अपघातात चालक ट्रकच्या केबीनममध्येच फसला. नंतर क्रेनच्या मदतीने चालकाला केबीनबाहेरकाढण्यात आले. ही घटना रविवारी (ता. पाच) दुपारी चार वाजताच्या सुमारास लोहारा एमआयडीसी परिसरात घडली. 

लोहारा एमआयडीसी परिसरात हरभरा भरून असलेल्या मेटॅडोरमधील डिझेल संपले होते. त्यामुळे चालक पंप मारत होता. त्याच सुमारास मेटॅडोअर अचानक सुरू झाला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन लगतच्या झाडावर जाऊन आदळले. या अपघातात चालक केबीनमध्येच फसला.

या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व लोहारा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. आतमध्ये चालक फसल्याने त्याला बाहेर पडता येत नव्हते. अखेर क्रेनचा वापर करून मेटॅडोरला झाडावरून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर कटरचा वापर करून चालकाला बाहेर काढण्यात आले. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून, त्याचा एक पायदेखील निकामी झाला. 

चालकाला तत्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. या अपघाताची नोंद लोहारा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अजूनही जखमी चालकाचे नाव कळू शकले नाही, अशी माहिती लोहारा पोलिस ठाण्यातील सूत्रांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT