छत्रपती शिवरायांनी तिनवेळा लुटले होते वऱ्हाडातील हे शहर

राम चौधरी 
शनिवार, 4 जुलै 2020

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य कोकण व पश्चिम महाराष्ट्रात तसेच दक्षिणेपर्यंत पसरलेले होते. विदर्भातील संपन्न वर्हाड प्रांत मात्र स्वराज्यात कधी आलाच नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांनी वऱ्हाडातील हे शहर तब्बल तीन वेळा लुटल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या शहराची संपन्नता अधोरेखित होते. 

वाशीम : छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य कोकण व पश्चिम महाराष्ट्रात तसेच दक्षिणेपर्यंत पसरलेले होते. विदर्भातील संपन्न वर्हाड प्रांत मात्र स्वराज्यात कधी आलाच नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांनी वऱ्हाडातील हे शहर तब्बल तीन वेळा लुटल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या शहराची संपन्नता अधोरेखित होते. 

सम्राट अशोकाच्या काळापासून दंडकारण्याच्या पश्चिमेकडचे असलेला संपन्न प्रदेश म्हणून वऱ्हाड प्रांत ओळखला जातो. या प्रांतामधे सध्याच्या अकोला, वाशीम,  अमरावती, बुलढाणा  व वर्धा जिल्ह्याच्या काही भागाचा समावेश होतो. हा वऱ्हाड प्रांत कापसाचे कोठार म्हणूनही प्रख्यात होता.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

काळी कसदार जमीन, मुबलक पाऊसपाणी त्यामुळेच या प्रांताला वऱ्हाड अन् सोन्याची कुऱ्हाड अशी म्हण प्रचलित झाली होती. याच वऱ्हाड प्रांतात कारंजा शहर पुरातन काळापासून संपन्न व्यापारी पेठ म्हणून ओळखली जाते.
येथील कापसाची बाजारापेठ देशविदेशात प्रख्यात होती. संपूर्ण देशातून कापसाचे व्यापारी या शहरात आले आणि इथल्या मातीतच रमले. रमलेच नाहीत तर या शहरात जगप्रसिद्ध ईमले बांधून राहीले. असे हे कारंजा शहर मोगल काळात महत्वाची व्यापारपेठ व मोगलांचे लष्करी ठाणे होते.

या शहराच्या संपन्नतेची वार्ता  छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत सुध्दा गेली होती. एक वेळ महाराजांनी खामगावला थांबून आपले सैन्य या शहरात घुसविले होते तर दोन वेळा खुद्द महाराजांनी मोगलांच्या या कुबेरनगरीची लुट केली होती. ही लुट शेकडो बैलावर लादून खामगावमार्गे स्वराज्यात नेली होती.
हा इतिहास आहे. मात्र काळाच्या ओघात हा इतिहास मागे पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही लुट काही वेळ बाळापूच्या किल्ल्यावर ठेवली होती हेही इतिहासात नमूद आहे. 

कारंजाची लुट करण्याआधी शिवाजी महाराज यांनी बाळापुरचा किल्ला हस्तगत केला होता. मात्र लुटीतील संपत्ती येथून स्वराज्यात रवाना केल्यानंतर मराठा सैन्याने बाळापूरचा भूईकोट किल्ला सोडून दिला होता. यानंतर पुन्हा मोगलांनी या किल्ल्याचा ताबा घेतला होता.  आजही कारंजा मोठी व्यापारपेठ म्हणून ओळखली जाते. शहराच्या चार बुलंद वेशी आजही उभ्या आहेत. काण्णवांचा जगप्रसिद्ध बंगला, कस्तूरीची हवेली या वास्तू शहराची संपन्नतेची साक्ष देते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola karanja city in Varhada was looted three times by Chhatrapati Shivaji