
नाईलाजाने महेंद्र यांच्या पत्नी व नातेवाईकांनी होकार देत नागपुरात जाण्याचे ठरवले. महेंद्र यांना नागपूरला हलवण्यापूर्वी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कुटुंबीयांकडून 42 हजार रुपये उकळले. सोबत 35 हजार रुपये औषधांचा खर्च देण्यास भाग पाडले. मात्र, नागपुरात महेंद्र यांचा मृत्यू झाला.
कामठी (जि. नागपूर) : येथील 50 वर्षीय इसमाला पोटात त्रास होत असल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्यांना व कुटुंबीयांना पुढील उपचारासाठी "कार्डिओलाजिस्ट'कडे जाण्याचा सल्ला दिला. मात्र, प्रकृती अधिकच खराब झाल्याने त्यांना नागपूरला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. तिथून त्यांना कोविड चाचणीसाठी मेडिकलमध्ये पाठवण्याचा सल्ला देण्यात आला. तब्बल चार रुग्णालय फिरविल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीसोबत पुढील घटनाक्रम घडला तो असा...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांद्री कन्हान येथे महेंद्र पानतावणे (50) हे राहतात. 26 जूनला त्यांच्या पोटात दुखत असल्याने नातेवाईकांनी कामठी येथील रुग्णालयात भरती केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी "कार्डिओलाजिस्ट'कडे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कुटुंबीयांनी महेंद्र यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांची प्रकृती अधिकच खालाचत गेल्याने अंतिमवेळी नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
जाणून घ्या - "आई प्लीज... तो बलात्कार नव्हे... प्रेम आहे आमचे'
नाईलाजाने महेंद्र यांच्या पत्नी व नातेवाईकांनी होकार देत नागपुरात जाण्याचे ठरवले. महेंद्र यांना नागपूरला हलवण्यापूर्वी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कुटुंबीयांकडून 42 हजार रुपये उकळले. सोबत 35 हजार रुपये औषधांचा खर्च देण्यास भाग पाडले. मात्र, नागपुरात महेंद्र यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूस डॉक्टर जबाबदार असल्याची तक्रार पत्नीने पोलिस आयुक्त कार्यालयाला केली आहे.
कामठीतील डॉक्टरांच्या म्हणण्यावरून महेंद्र यांना कुटुंबीयांनी नागपुरात उपचारासाठी आणले. यावेळी डॉक्टरांनी महेंद्र कोरोनाबाधित असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून महेंद्र यांची कोविड-19ची तपासणी करण्यासाठी मेडिकल रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिला.
अधिक माहितीसाठी - पत्नीच्या जिद्दीसमोर हरला पती; मनावर दगळ ठेऊन इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले, मात्र...
नागपुरातील डॉक्टरांच्या सांगण्यावर कुटुंबीय रुग्णाला घेऊन मेडिकल हॉस्पिटलमध्ये गेले. मात्र, येथील डॉक्टरांनी महेंद्र यांना मृत घोषित केले. तरीही येथील डॉक्टरांनी महेंद्र यांची कोविड चाचणीचे नमुने घेतले. दुसऱ्यादिवशी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. मेडिकलमधील डॉक्टरांनी महेंद्र यांचे शवविच्छेदन केले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे सष्ट होऊ शकले नाही, असे आरोप मृताची पत्नी शालू महेंद्र पानतावणे यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
काठतीतील डॉक्टरांनी रुग्णाला उपचारासाठी नागपुरात पाठवले. तसेच कुटुंबीयांकडून 77 हजार रुपयेही उकळले. प्रथम नागपुरातील खासगी डॉक्टरला फोन करून रुग्णावर उपचार न करण्याचा सल्ला डॉक्टरनी दिला. यानंतर मेडिकलमध्येही डॉक्टरांना फोन करून शवविच्छेदन करण्याचा मनाई केल्याचा अरोप मृताची पत्नी शालू यांनी केला आहे.
हेही वाचा - ती रडत रडत म्हणाली, 'तू पण तर मुलगी आहे, प्लीज माझा अश्लील व्हिडिओ नको काढू...'
कामठी येथील नामवंत हॉस्पिटलमध्ये सायंकाळी ड्युटीवर असलेले डॉक्टर अजय पिल्लेवान यांनी नवीन कामठी पोलिस ठाण्यात मृताच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी मृताच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करीत लातबुक्क्यांनी मारहाण केल्याचा अरोप केला आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था व मालमत्तेची हाणी या कलमानुसार गुन्हा दाखल केला होता.