Chimur
Chimur 
विदर्भ

चिमूर : पाच महिन्यांपासून कार्यालयाची बत्ती गुल

जितेंद्र सहारे

चिमूर : सार्वजनिक उपक्रम सेवा व सुविधे विषयी प्रशासकीय स्तरावर फारच उदासीनता असल्याचे दिसुन येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे चिमूर येथील सिंचाई विभागाचे शाखा अधिकारी कार्यालय आहे. कारण मागील पाच महिन्यांपासून कार्यालयाची बत्ती गुल आहे, तसेच खिडक्या तुटलेल्या, गडणारे छत आणी जुगाड केलेली टेबल अशी कार्यालयाची दुर्दशा झाली आहे.

सिंचाई शाखा कार्यालया तर्फे दहा प्रकारच्या सेवा देण्यात येतात. पाणी वापर संस्थेस देय्य पाणी हक्क मंजूरी देणे, पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे, बिगर सिंचन पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे, पाणीपट्टी देयक तक्रार निवारण करणे, लाभक्षेत्राचा दाखला देणे, ग्राम पंचायत, जिल्हा परीषद, नगर पालिका, नगर परीषद, नगर पंचायात, कटक मंडळे यांना घरगुती पाणी वापर परवाना देणे, खासगी, विकासक विशेष नगर विकास प्रकल्प यांना घरगुती औद्योगिक पाणी वापर परवाना देणे, औद्योगीक प्रयोजनासाठी पाणी वापर परवाना देणे, नदी व जलाशयापासून अंतराचा दाखला देणे तसेच उपसा सिंचन परवानगी देण्याची कामे सिंचाई शाखा कार्यालयातुन केल्या जाते. मात्र ही सर्व कार्यालयीन कामे संगणिकृत करण्याकरीता विजच नसल्याने कामे प्रलंबित असल्याने नागरीकांना कार्यालयाच्या हेलपाट्या माराव्या लागतात.

सर्व प्रकारचे शासकीय कामे संगणीकृत करणे तसेच डिजिटल इंडिया घोषणा या कार्यालयातच विरल्याचे कार्यालयाच्या दुरदर्शेवरून दिसुन येते. तसेच या कार्यालया अंतर्गत भिसी, डोंगरगाव, खोलदोडा व भीसी -पिटीचुवा इत्यादी चार लघु पाटबंधारे तलाव समाविष्ठ आहेत. तर पिपर्डा, पळसगाव, नवतळा, मोटेगाव, काजळसर, अडेगाव व कारघाटा येथील सात मामा तलाव असे एकुण अकरा तलावांची देखभाल दुरुस्ती, पाणीसाठा तपासणी, पाणी वाटप इत्यादी कामे केली जातात. मात्र हि सर्व अकरा तलावाची जबाबदारी एकाच कालवा निरीक्षकावर असुन या तलावाच्या जबाबदारी व्यतिरीक्त कार्यालयीन कामे सुद्धा त्यांना सांभाळावे लागत असल्याने. शेतकरी व नागरीकांना कामा करीता कार्यालयाच्या हेलपाटया माराव्या लागतात. त्यामुळे शासणाने या कार्यालयास  दुरदशे पासुन मुक्त करावे तसेच रिक्त पदे भरावी अशी मागणी नागरीक करीत आहेत.

तुटलेले जुगाड करून बांधलेले कार्यालयीन टेबल, पावसात गळणारे छत, तुटलेल्या खिडक्या गज अशा प्रकारची दुर्दशा असुन एकट्या महिला चपराशी कार्यालयात कुणी आले तर येतात. अन्यथा कार्यालयात स्मशान शांतता पसरलेली असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT