file photo
file photo 
विदर्भ

नगरसेवकासह अकरा जण पसार

सकाळ वृत्तसेवा

अमरावती ः वाळू माफियाचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला घातक शस्त्रांसह अटक झाली होती. शनिवारी (ता. 22) विशेष न्यायालयाने चौघांच्याही पोलिस कोठडीची मागणी फेटाळून लावत त्यांना जामीन मंजूर केला. या टोळीतील नगरसेवकासह अकरा जण अद्याप पसार आहेत.
मो. सादिक शेख रज्जाक, नय्यर अली बेग मुकद्दर अली बेग, वसीम खान माले खान, आबिद खान यांना गाडगेनगर पोलिसांनी विशेष न्यायालयापुढे हजर केले. पोलिसांनी त्यांच्या कोठडीची मागणी न्यायालयात केली, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. या प्रकरणी नमूद चौघांसह फिर्दोस खान ऊर्फ बाबा सलीम खान, अनवर हुसैन, श्‍याम बंबईया, अहमद खान रहमत खान, राजा, तन्वीर खान, एजाज खान, फिरोज खान, सोनू, शेख जफर शेख जब्बार, अलीम खान ऊर्फ लाला माले खान अशा एकूण 15 जणांविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल आहेत. दोन देशी बनावटीचे पिस्टल, पाच जिवंत काडतूस आणि चौदा तलवारी असा शस्त्रसाठा जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही पहिलीच कारवाई आहे. ही शस्त्रे कुणी पुरवली, अमरावतीत कुणाच्या सांगण्यावरून आणि कशासाठी आणली. कुणाच्या सांगण्यावरून कारमध्ये ठेवली याबाबत पोलिसांना अटकेतील चौघांकडून ठोस माहिती मिळाली नाही. पसार अकरा जणांच्या अटकेसाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT