Gadchiroli Loksabha Election
Gadchiroli Loksabha Election sakqal
विदर्भ

Gadchiroli Loksabha Election : ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

सकाळ वृत्तसेवा

Gadchiroli News : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास मंगळवार (ता. १६) सुरूवात करण्यात आली. येथील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांना हेलिकाॅप्टरद्वारे एअर-लिफ्ट करून मतदान केंद्रावर पोहचविण्यात आले.

गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा ६८ मतदान केंद्रांवरील ७२ निवडणूक पथकाच्या २९५ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह मंगळवारी सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या ३-एम.आय.- १७ आणि ४-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले.

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पथकांना सुरक्षीतपणे पोहचविण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Chitta Ranjan Das: आज मला खरं सांगायला हवं... निवृत्तीच्या दिवशी RSS बद्दल न्यायमूर्ती असे का म्हणाले?

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियाचे शेअर्स वधारले, नेस्लेचा शेअर घसरला

Star Sports Hits Back Rohit Sharma : 'हिटमॅन' रोहित शर्माच्या आरोपांवर स्टार स्पोर्ट्सने केला पलटवार; म्हणाले...

Gold Rate: सोने-चांदी तोडणार सर्व रिकॉर्ड? इराण ठरणार कारणीभूत; जाणून घ्या भाव

Raghuram Rajan: 'भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल पण...', RBIचे माजी गव्हर्नर यांनी व्यक्त केली चिंता

SCROLL FOR NEXT