विदर्भ

अभ्यासाचा ताण असह्य; विद्यार्थिनीने घेतला होस्टेलमध्ये गळफास

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अभ्यासाचा ताण असह्य झाल्यामुळे खासगी वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना आज मंगळवारी दुपारी उघडकीस आली. पलक विनोद भंडारी (वय 18, रा. धनकी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलक भंडारीने गोकुळपेठेतील कॅंडेंस ऍकेडमीत फॅशन डिझाइनिंगमध्ये प्रवेश घेतला होता. गेल्या तीन महिन्यांपूर्वी ती बाजीप्रभूनगरातील सुंदर अपार्टमेंटमधील जैनम वसतिगृहात राहायला आली होती. एका रूममध्ये तीन मैत्रिणी राहत होत्या. येत्या पाच ऑक्‍टोबरपर्यंत पलकला काही मोजमापासंबंधीचा प्रोजेक्‍ट सबमिट करायचा होता. पलकचा तो प्रोजेक्‍ट अपूर्ण होता. त्यामुळे ती गेल्या तीन दिवसांपासून तणावात वावरत होती. या संदर्भात तिने मैत्रिणींशी चर्चा केली होती. परंतु, प्रोजेक्‍ट पूर्ण होणार नसल्याची खात्री तिला झाली होती. तसेच तिला ऍसिडिटी आणि भोवळ येण्याचा त्रास होता. बुधवारी सकाळी तिच्या दोन मैत्रिणी कॉलेजला निघून गेल्या, तर पलक प्रोजेक्‍ट पूर्ण करण्यासाठी रूमवर थांबली होती. या दरम्यान पलकने गळफास लावून आत्महत्या केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT