file photo
file photo 
विदर्भ

गोरेगाव तहसीलच्या लिपिकाला लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : शेतजमिनीच्या वाटणीचे प्रस्ताव मंजूर करण्याकरिता तक्रारदाराकडून 10 हजारांची लाच घेताना गोरेगाव येथील तहसील कार्यालयाच्या कनिष्ठ लिपिकाला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयात केली. राहुल हरिश्‍चंद्र चोपकर (वय ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार हे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यांचे वडील, काका आणि चुलतआजोबा यांच्या नावे सोनी आणि नोनीटोला येथे संयुक्त शेतजमीन आहे. या शेतजमिनीच्या वाटणीचे दोन प्रस्ताव त्यांनी तहसील कार्यालय गोरेगाव येथे एप्रिलमध्ये सादर केले होते. दरम्यान, प्रस्तावाबाबत विचारपूस करण्याकरिता ते जून महिन्यात लिपिक चोपकर यांना भेटले. या वेळी दोन्ही प्रस्ताव मंजूर करण्यासाठी चोपकरने तक्रारदाराला 14 हजारांची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पथकाने शनिवारी तहसील कार्यालयात सापळा रचला. या वेळी चोपकरला 10 हजारांची लाच घेताना पथकाने अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT