Heavy rainfall in Vidarbha from Saturday 
विदर्भ

प्रादेशिक हवामान विभागाने दिला पुन्हा इशारा, धानपट्टा भागात होणार हे...

नरेंद्र चोरे

नागपूर : विदर्भात काही दिवस चांगला पाऊस पडल्यानंतर दडी मारली. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. उकाळ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. पाऊस आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. यामुळे अनेकांनी पेरणी केल्या. आता मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असताना आनंदाची बातमी आली आहे. 

हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्‌टा येत्या 48 तासांत विदर्भाच्या दिशेने सरकण्याची दाट शक्‍यता आहे. त्याच्या तीव्र प्रभावामुळे विदर्भात शनिवारपासून दोन-तीन दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे. विशेषत: नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांमध्ये वादळाची दाट शक्‍यता आहे. विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाचा हा इशारा चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारासारख्या धानपट्ट्यासाठी निश्‍चितच आनंदाची बातमी आहे. कारण, या भागांत अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे रोवण्याही खोळंबल्या आहेत. रोवण्याची वेळ निघून जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी उकाडाही वाढलेला आहे. 

मॉन्सूनचे आगमन झाल्यापासून विदर्भात अजूनही पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. तब्बल सात जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. केवळ वाशीम आणि बुलडाणा या दोन जिल्ह्यांमध्येच पावसाने सरासरी गाठलेली आहे. अकोला, यवतमाळ व गडचिरोली या जिल्ह्यांची स्थिती अतिशय नाजूक आहे. तथापि पावसाचे अजूनही दोन महिने शिल्लक असल्यामुळे तुट भरून निघण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

विदर्भात पुन्हा पावसाला पोषक वातावरण

बंगालच्या उपसागरात नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे येत्या शनिवारपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाची शक्‍यता आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिलेला आहे. 

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT