esakal | म्हशीचे दूध उत्तम की गायीचे.. जाणून घ्या  कधी न सुटलेल्या कोड्याचे उत्तर..
sakal

बोलून बातमी शोधा

cow milk is good for health or buffalo milk read answer

दुधात अनेक प्रकारचे आयुर्वेदिक गुणधर्म असतात तसेच प्रोटीनची मात्राही असते. म्हणूनच लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत दूध सगळ्यांना महत्वाचे असते. मात्र दुधात भेसळयुक्त पदार्थ मिसळून दुधातील पोषकता कमी केली जाते.  

म्हशीचे दूध उत्तम की गायीचे.. जाणून घ्या  कधी न सुटलेल्या कोड्याचे उत्तर..

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर: आपल्या जीवनात दुधाचे अनन्यसाधारण महत्व आहे. जन्म घेताच आईचे दूध आपल्यासाठी संजीवनी म्हणून काम करते. लहानाचे मोठे होत असताना हेच दूध आपली शक्ती वाढवते. आपल्याला सतत निरोगी ठेवण्याचे कामही दूध करते. मात्र कोणाचे दूध सर्वाधिक चांगले गायीचे की म्हशीचे? हा प्रश्न आपल्यापैकी अनेकजणांना नेहमीच पडत असेल.  चिंता करू नका आज आम्ही तुमच्या मनात निर्माण झालेल्या या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.   

दुधात अनेक प्रकारचे आयुर्वेदिक गुणधर्म असतात तसेच प्रोटीनची मात्राही असते. म्हणूनच लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत दूध सगळ्यांना महत्वाचे असते. मात्र दुधात भेसळयुक्त पदार्थ मिसळून दुधातील पोषकता कमी केली जाते.  काही लोकांना गायीचे दूध जास्त पोषक वाटते तर काहींना म्हशीचे. म्हणूनच जाणून घेऊया आपल्या शरीरासाठी कोणाचे दूध जास्त उत्तम आहे. 

जाणून घ्या - घरात सापडलेली तांब्याची वस्तू निघाली तब्बल 1500 वर्ष जुनी; इतिहास बघितला आणि सर्वांनाच बसला धक्का..

पाण्याचे प्रमाण  

गायीचे दूध पातळ असते त्यामुळे चांगले नसते असा समज अनेकांचा असतो . मात्र म्हशीच्या दुधाच्या तुलनेत गायीच्या दुधात अधिक प्रमाणात पाणी असते. म्हणून गायीचे दूध पातळ असते. गायीच्या दुधात साधारणतः ८७ ते ८८ टक्के पाणी असते त्यामुळेच गायीचे दूध लवकर पचते. म्हणूनच अनेकजण रात्रीच्या वेळी दूध पिऊन झोपतात.  

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण

म्हशीच्या दुधात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. त्या तुलनेत गायीच्या दुधात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते. म्हणूनच उच्च रक्तदाब किंवा पोटाचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी म्हशीचे दूध पिणे फायद्याचे असते. 

कॅलरीजची मात्रा 

म्हशीच्या दुधात गायीच्या दुधाच्या तुलनेत  कॅलरीजची मात्रा अधिक प्रमाणात असते. १ कप म्हशीच्या दुधातून आपल्याला तब्बल  २७४ कॅलरीज मिळतात. मात्र १ कप गायीच्या दुधातुनआपल्याला फक्त १४५ कॅलरीज मिळतात. 

फॅटचे प्रमाण 

गायीच्या दुधात फॅटचे प्रमाण कमी असते साधारणतः  गायीच्या दुधात ३-४ टक्के फॅट असते. म्हशीच्या दुधात ८-९ टक्के फॅटचे प्रमाण असते. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी म्हशीचे दूध अधिक फायदेशीर असते. 

अधिक वाचा - तंबाखू खाणाऱ्यांचे आता होणार हाल..कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विक्रेत्यांनी कसली कंबर.. वाचा सविस्तर

तयार करण्यात आलेले पदार्थ 

म्हशीच्या दुधापासून बनवलेले पनीर, दही, तूप हे पदार्थ अधिक चविष्ट असतात मात्र या पदार्थांमुळे वजन वाढते. तर गायीच्या दुधापासून बनवण्यात आलेले पदार्थ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. 

गायीचे दूध पचायला हलके आणि पित्तशामक असते तर म्हशीचे दूध पचायला जड असते त्यामुळे गायीचे दूधच आरोग्यसाठी आणि निरोगी राहण्यासाठी उत्तम असते.       

loading image