leopard in buldana district.jpg 
विदर्भ

बिबट्या आला रे...परिसरात शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण; असा केला हल्ला!

सकाळ वृत्तसेवा

मोताळा (जि.बुलडाणा) : बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता.14) पहाटे पान्हेरा शिवारात उघडकीस आली. यात संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्‍यातील पान्हेरा येथील शेतकरी मधुकर पंढरी चौधरी यांनी पान्हेरा गावालगत गट नंबर 74 मधील शेतातील वाड्यानजीक सात ते आठ जनावरे बांधलेली होती. दरम्यान, बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने या पशुधनावर हल्ला करून एका गायीला ठार केले. सुदैवाने इतर पशुधनाला कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती आहे.

शेतकरी मधुकर चौधरी हे गुरुवारी पहाटे पशुधनाला चारापाणी करण्यासाठी शेतात गेल्यावर सदर प्रकार उघडकीस आला. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान, सरपंच सुनील वैराळकर यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. 

सदर गाय जर्सी प्रजातींची असून, तिची किंमत अंदाजे 50 हजार रुपये होती, असे पीडित शेतकऱ्याने सांगितले. सततच्या दुष्काळी परिस्थितीने हतबल झालेल्या शेतकऱ्यावर या घटनेमुळे आर्थिक संकट कोसळले आहे. वन विभागाने संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बिबट्याचा धुमाकूळ सुरूच
मागील महिन्यात पान्हेरा शिवारात गोठ्यात बांधलेल्या पशुधनावर बिबट्याने हल्ला करून एका गायीचा फडशा पाडला होता. तर, काही दिवसांनी काबरखेड नजीकच्या दूधमाळ शिवारात शेतात बांधलेल्या वासराला बिबट्याने ठार केले होते. आता पान्हेरा गावालगत बिबट्याने मजल मारून गाईवर निशाणा साधला आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: बापरे! मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहेत २० हून जास्त लोकं, एकदा यादी पाहाच

Stock Market Today: दोन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजारात जोरदार उसळी! कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स? पाहा आजचे IPO अपडेट

Kolhapur Lawyer Assault Case : वकील महिलेस मारहाण, सर्किट बेंचने घेतली दखल; कोल्हापूर पोलिस अधिक्षकांना तातडीने आले हायकोर्टात

Ahilyanagar News: शरीराने धडधाकट, तरी दिव्यंगत्त्वाचा कट; अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून २० गुरुजींवर हाेणार कारवाई, अनेकांना धास्‍ती..

Latest Marathi News Live Update : स्वीकृत नगरसेवक पदासाठी एक वर्षाचा फॉर्म्युला; भाजप-शिंदे सेनेत मोठी स्पर्धा

SCROLL FOR NEXT