inspiring story of swapnil sangidwar and prashik bhanarkar became sub-inspector
inspiring story of swapnil sangidwar and prashik bhanarkar became sub-inspector Sakal
विदर्भ

PSI Success : स्वप्नीलसह प्रशिकचेही उपनिरीक्षक पदाचे स्वप्न पूर्ण, पालक झाले धन्य; एकाचे वडील वाहनचालक, तर दुसऱ्याचे पोलिस अंमलदार

सकाळ वृत्तसेवा

Gadchiroli News : आतापर्यंत पोलिस शिपाई किंवा वनरक्षक होण्याचीच महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांची स्पप्ने मोठी होत असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत स्वप्नील ज्योती विलास संगीडवार व प्रशिक वंदना चंद्रहास भानारकर या दोन तरुणांनी आपले पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

अराजपत्रित गट ब (पीएसआय ) महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०२१ चा निकाल घोषित झाला असून यात गडचिरोलीतील युवक स्वप्नील संगीडवार याने बाजी मारली व पोलिस उपनिरीक्षक होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. स्वप्निलने आपले हायस्कूलचे शिक्षण स्थानिक शिवाजी हायस्कूल व पदवीचे शिक्षण शिवाजी महाविद्यालयात पूर्ण केले.

२०१६-१७ पासून त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी सुरू केली. तो निवृत्त वाहनचालक(जलसंपदा विभाग) विलासराव संगीडवार व ज्योती संगिडवार यांचा मुलगा आहे. एमपीएससी परीक्षेचा निकाल घोषित होताच मित्रमंडळीकडून डिजेच्या गजरात व गुलाल उधळून स्वप्निलचे जंगी स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.

तसेच लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट 'ब' परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक २०२१ च्या परीक्षेत गडचिरोली तालुक्यातील पोर्ला या गावातील प्रशिक भानारकर यानेही पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. प्रशिकचे प्राथमिक शिक्षण गडचिरोली येथील नगर परीषद संकुल शाळेत झाले.

कनिष्ठ विद्यालयीन शिक्षण शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, तर महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी महाविद्यालयात पूर्ण केले. त्याचे वडील पोलिस हवालदार असून आई गृहिणी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२१ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाच्या ३७६ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. प्रशिकने आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील, शिक्षक व मित्रपरिवारास दिले आहे. दोघांचेही या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

आत्मनिर्भर तयारी

स्वप्नीलने स्पर्धा परीक्षेची तयारी कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता व मोठ्या शहरात न जाता आपल्याच घरी राहून केली. प्रशिकनेसुद्धा पर्धा परीक्षेच्या खासगी शिकवणीकरिता मोठ्या शहराकडे धाव न घेता संपूर्ण शिक्षण गडचिरोली येथे घेत स्पर्धा परीक्षेचे शिखर सर केले आहे. दोघांनीही मोठे कोचिंग क्लास किंवा मोठी शहर टाळून आत्मनिर्भर होत हे यश मिळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT