file photo
file photo 
विदर्भ

फासात अडकून बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील नरनाळा परिक्षेत्रात फासात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 11) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली.
नरनाळा क्षेत्रातील खंडाळा गावाजवळ असलेल्या एका नाल्याजवळ बफर क्षेत्रात ही घटना घडली. परिसरात अनेकांच्या शेतजमिनी आहेत. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी येथे लाकडाचा फास लावला होता. हा फास सायळची शिकार करण्यासाठी लावल्या गेल्याची शक्‍यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. नेमका त्याच फासात गुरुवारी सकाळी हा बिबट अडकला. त्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने धडपड केली. त्याच धडपडीत बिबटचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. परिसरातील ग्रामस्थांनी घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना दिली. शासकीय पशुशल्यचिकित्सकांसह वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत बिबट हा एक वर्षे वयाचा असल्याने नरनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी विश्‍वनाथ चव्हाण यांनी सांगितले. दुपारी जंगलात पंचनामा केल्यानंतर मृत बिबट्याला जाळण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT