file photo
file photo 
विदर्भ

Video : चिखलदऱ्यात रस्त्याशेजारीच होतेय बिबट्याचे दर्शन 

नारायण येवले

चिखलदरा (जि. अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातील वन्यप्राणी आता दिवसाही रहदारीच्या रस्त्यावर दर्शन देऊ लागले आहेत. संख्येत वाढ झाली असून जंगलात शिकार मिळत नसल्याने वन्यप्राणी आता गावाकडे कूच करायला लागल्याचे जाणकार सांगत आहेत. असे असले तरी प्राण्यांचे सहज दर्शन होत असल्याने विदर्भाच्या नंदनवनात येणारे पर्यटक मात्र जाम खुश आहेत. 

बिबट्यांची संख्या वाढली 
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर शनिवार, रविवार या सुटीच्या दिवसासह इतर दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. परतवाडा-धामणगावगढी मार्गे चिखलदरा येणाऱ्या स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना मागील काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. पूर्वी कधीकाळी रात्री होणारे दर्शन आता दिवसाही होत असल्याने मेळघाटच्या जंगलात बिबट्यांची संख्या वाढल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

मार्च महिन्यानंतर उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ गावाकडे फिरकणारे हे वन्यप्राणी हिवाळ्यात दर्शन देऊ लागल्याने पर्यटकांमध्ये कुतुहल आहे तर स्थानिक नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. मेळघाट वाघाच्या नावाने प्रसिद्ध असला तरी पर्यटकांना क्वचितच वाघोबाचे दर्शन व्हायचे. परंतु आता वाघोबाऐवजी बिबट्याचे सहज दर्शन होत आहे. 

सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मोथा ते मडकी मार्गावर रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही बिबट्याचे दर्शन झाले. यापूर्वी रात्रीच्या सुमारास याच मार्गावर वाहनधारकांना बिबट्या दिसला होता. 

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 
रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने जवळ जाऊनसुद्धा बिबट शांतपणे बसून राहत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे बिबट्याच्या या हालचाली अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केल्या. 

शिकाऱ्यांपासून धोका? 
मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचा परिसर आता वाढला असून प्रादेशिक वनविभागाचा परिसर कमी झाला आहे. त्यामुळे चिखलदरासह आजूबाजूचा परिसर अतिसंरक्षित घोषित झाल्यानंतर मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या गुगामल सिपना वन्यजीव विभागात यापूर्वी घटांग, ढाकणा, कोहा या परिसरात वाघाच्या शिकारीचे प्रकरण घडले होते. तर काही महिन्यांपूर्वी मोथा गावानजीकच्या जंगलात वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. अशात वन्यप्राण्यांचे रस्त्यावर दर्शन होत असल्याने शिकारीपासून वाचविण्याची खबरदारी वन आणि व्याघ्रप्रकल्प प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT