File photo
File photo 
विदर्भ

मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

सकाळवृत्तसेवा

मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात
नागपूर : महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप सप्टेंबरचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे पुढील महिन्यात पहिल्याच आठवड्यात दिवाळी असून ऑक्‍टोबरचे वेतनासाठीही अशाचप्रकारे महिनाअखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार काय? अशी चिंता अधिकारी, कर्मचारी व्यक्त करीत आहे. दुसरीकडे टप्प्या-टप्प्याने वेतन अदा करणाऱ्या महापालिका प्रशासनापुढे दिवाळीमुळे पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सर्वांचे वेतन कसे करावे, असा पेच निर्माण झाला आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने दर महिन्याला टप्प्या-टप्प्याने कर्मचाऱ्यांचे वेतन केले जाते. काही कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वेतन महिनाअखेरपर्यंत होते. सप्टेंबरचेही वेतन अद्याप अनेकांना अदा झाले नाही. पुढील महिन्यात 7 तारखेला दिवाळी आहे. महापालिकेची स्थिती बघता अनेक कर्मचाऱ्यांची आतापासूनच ऑक्‍टोबरच्या वेतनावरून झोप उडाली आहे. महापालिका प्रशासनाकडून अद्याप पुढील महिन्यातील वेतनासंबंधी कुठलीही प्रक्रिया नसल्याने कर्मचारी, अधिकारी दिवाळी अंधारात जाण्याची भीती व्यक्त करू लागले आहेत. एकीकडे महापालिकेत कंत्राटदारांनी देयकांसाठी आंदोलन सुरू केले असून आजही प्रशासनाने त्यांना आश्‍वासन दिले. कंत्राटदारांची स्थिती बघता कर्मचाऱ्यांनीही प्रशासनावर दडपण तयार करण्यासाठी आंदोलनाची रणनीती आखली आहे. जुन्याच प्रलंबित मागण्या पुढे करून पुढील महिन्यातील वेतन दिवाळीपूर्वीच पदरात पाडून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढील आठवड्यात आंदोलनाची तयारी केली आहे.
दिवाळीपूर्वी व्हावे वेतन
सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन एकाचवेळी करण्याबाबत प्रशासनाचा प्रयत्न आहे. आतापर्यंत महापालिका ज्याप्रमाणे पैशाचा ओघ येतो, त्याप्रमाणे वेतन करीत आहे. आता कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन न दिल्यास पालिकेची अब्रू आणखी वेशीवर टांगल्या जाण्याची शक्‍यतेने प्रशासनापुढेही मोठा पेच निर्माण झाला आहे. तर आंदोलनामुळे प्रशासनावर दडपण तयार करून दिवाळीपूर्वी वेतन व्हावे, असाच कर्मचाऱ्यांचा उद्देश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT