File photo
File photo 
विदर्भ

विदर्भात डेंगीत नागपूर जिल्हा टॉपवर

सकाळवृत्तसेवा

विदर्भात डेंगीत नागपूर जिल्हा टॉपवर
नागपूर : स्क्रब टायफसचे 156 रुग्ण आढळले असून यातील 18 जण दगावले आहेत. सध्या स्क्रब काहीसा थांबला आहे. मात्र, डेंगीने कहर केला आहे. उपराजधानीचे शहर असलेल्या नागपुरात अवघ्या आठ दिवसांत 45 डेंगीग्रस्तांची नोंद झाली. तर शहरात आतापर्यंत डेंगीग्रस्तांचा आकडा 172 पोचला. नागपूर जिल्ह्यात 255 डेंगीग्रस्तांची नोंद असल्याचे आरोग्य विभाग सांगतो. विदर्भात डेंगीग्रस्तांची संख्या 800 वर पोचली आहे. खासगीसह सरकारी रुग्णालयात डेंगीग्रस्तांची गर्दी रुग्णालयात आहे. खाटा हाउसफुल्ल आहेत. वर्षभरापासून डेंगीचा विदर्भात डेंगीग्रस्तांमध्ये नागपूर जिल्हा टॉपवर आहे. डेंगीग्रस्त आढळल्यानंतरही महापालिकेचा आरोग्य विभाग फारसा गंभीर नाही. डास निर्मूलनाची मोहीम महापालिकेने सुरू केली नाही. केवळ फॉगिंग सुरू केल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात डेंगीग्रस्त परिसरात विचारणा केली असता महापालिकेकडून फॉगिंग होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून आली आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात शहरात आठ हजारांपेक्षा अधिक घरांमध्ये डेंगीच्या अळ्या आढळल्या आहेत. कोणावरही कारवाई मात्र होत नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीत 30 सप्टेंबरपर्यंत डेंगीचे 800वर रुग्ण आढळले आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील 255 डेंगीग्रस्तांचा समावेश आहे. नागपूर खालोखाल डेंगीचे सर्वाधिक रुग्ण अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.
चालू वर्षात डेंगीचा विळखा पडलेल्यांपैकी 7 जण दगावले आहेत. आरोग्य विभागाने तशी नोंद घेतली आहे. त्यातील सर्वाधिक पाच मृत्यू वर्धा जिल्ह्यात नोंदविले गेले आहेत. आश्‍चर्य म्हणजे नागपुरात सर्वाधिक डेंगीग्रस्तांची नोंद असतानाही जिल्हात फक्त दोन जण डेंगीने दगावल्याचा दावा आरोग्य विभाग करीत आहे.
जरीपटका, कपिलनगर, नारा-नारी, पिवळी नदी, ख्वाजा गरीब नवाजनगर, महेंद्र नगर, कांजी ओळ, वैशालीनगर भागातही जागोजागी वाढलेल्या झुडपांमुळे डेंगीच्या डासांची पैदास वाढली आहे.

एडिस डासांची नवी पिढी डेंगीची वाहक आहे. हा विषय संवेदनशील झाला आहे. डासांची नवी पिढी नष्ट करणे हाच यावर उपाय आहे. यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र, नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. डासांची पैदास होणार नाही यावर नागरिकांनी भर द्यावा. एक दिवस ड्राय डे पाळावा.
-डॉ. मिलिंद गणवीर,
सहायक संचालक, नागपूर आरोग्य विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT