विदर्भ

कॉंग्रेस असंतुष्टांचे "दिल्ली चलो' 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व कॉंग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांना हटविण्याची मागणी करण्यासाठी नागपुरातील असंतुष्ट कॉंग्रेस नेत्यांनी दिल्ली गाठली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार खासदार अहमद पटेल यांची भेट घेण्याचा असंतुष्टांचा प्रयत्न सुरू आहे. 

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. महापालिका निवडणुकीपासून चव्हाण यांना उघडपणे विरोध सुरू झाला आहे. एका जाहीर सभेत अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्याचे कृत्य चतुर्वेदी यांच्या कार्यकर्त्याने केले होते. त्यामुळे शहर कॉंग्रेसने चतुर्वेदी, नितीन राऊत यांच्यावर कारवाई करण्याचा अहवाल पाठविला होता; परंतु प्रदेश कॉंग्रेसने कोणतीही भूमिका न घेतल्याने पक्षविरोधी कार्य करणाऱ्यांना अभय मिळाले होते. आता हेच असंतुष्ट चव्हाण यांच्यावर उलटले आहेत. 

नागपूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे हे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे समर्थक मानले जातात. चतुर्वेदी व मुत्तेमवार यांच्यात छत्तीसचा आकडा असल्याने या वादाने नागपूर शहर कॉंग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आली आहे. शहरातील असंतुष्टांचे नेतृत्व चतुर्वेदी करत आहेत. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अमेरिकेत असल्याने असंतुष्ट खासदार आता अहमद पटेल यांची भेट घेणार असल्याचे समजते. अशोक चव्हाण यांच्यासोबतच कॉंग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनाही हटविण्याची मागणी केली जाणार आहे. मोहन प्रकाश यांना हटविण्यासाठी राज्यातील अनेक नेते इच्छुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT